IPL 2020 : छोट्या गावचा मुलगा अन् पैलवानाचा नातू, आता झाला IPLमधला सर्वात मोठा मॅन विनर खेळाडू

IPL 2020 : छोट्या गावचा मुलगा अन् पैलवानाचा नातू, आता झाला IPLमधला सर्वात मोठा मॅन विनर खेळाडू

धोनी, कोहलीपासून मोठमोठ्या विदेशी खेळाडूंना टक्कर देतोय हरियाणाचा हा मॅच विनर क्रिकेटपटू.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : आयपीएलमध्ये यावेळी अनेक युवा खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. यात आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूंची जास्त चर्चा आहे. मात्र या सगळ्यातून प्रत्येक सामन्यात आपल्या नावाची चर्चा घडवून आणणारा खेळाडू म्हणजे राहुल तेवातिया. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या तेवातियानं पराभवाच्या छायेतील संघाला बाहेर काढून विजय मिळवून दिला. राहुल तेवतियाने त्याच्यातील एका मॅच विनरचे दर्शन घडविले आहे. हरियाणातील एका छोट्या गावातून आलेल्या तेवातियाचं नाव सध्या सर्वांच्या ओठी आहे.

राहुल तेवातिया खास फलंदाज आहे ते त्याच्या आक्रमक खेळीमुळे. किंग्स इलेव्हन विरुद्धच्या सामन्यात त्यानं एकाच सामन्यात 5 षटकार मारून राजस्थानला मोठा विजय मिळवून दिला होता. त्याने हैदराबादविरुद्ध पुन्हा मॅच विनिंग खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला. हैद्राबादने दिलेलं 159 धावांचं लक्ष्य पार करताना राजस्थानचा अर्धा संघ 78 धवांवर परतला होता, शा स्थितीत तेवतियाने 28 चेंडूत 45 केल्या. विशेष म्हणजे त्याने राशिद खानच्या एका ओव्हरमध्ये तीन षटकार खेचले.

वाचा-सनरायझर्स हैदराबादच्या विजयापेक्षा रियान परागच्या ‘त्या’ VIDEOची सगळेकडे चर्चा

हरियाणातील एका छोट्या गावातून आला आहे तेवतिया

राहुल तेवातिया हा हरियाणातील फरीदाबादमधील सिंह गावचा रहिवासी आहे. त्याचे आजोबा पैलवान तर काका हॉकी खेळाडू होते. गावात या दोन खेळांचीच धूम होती, मात्र आपला मुलगा क्रिकेटर व्हावा असे त्याच्या वडिलांना वाटत होते. म्हणून त्याला 12 वर्षांचा असताना माजी क्रिकेटर विजय यांच्याकडे पाठविले आणि काही वर्षांनी त्यांची मेहनत फळाला आली.

वाचा-सनरायझर्स हैदराबादच्या विजयापेक्षा रियान परागच्या ‘त्या’ VIDEOची सगळेकडे चर्चा

यादव यांच्यानुसार तेवतिया हा सामन्यांच्या शेवटच्या पाच ओव्हरमध्ये जोरदार फलंदाजी करू शकतो. मॅच ओढून आणण्याची त्याच्यात क्षमता आहे. त्याने प्रथम श्रेणीच्या सामन्यात 60 चेंडूंत शतक ठोकले होते. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने 15 षटकार ठोकले असून यात तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 152 च्या स्ट्राईक रेटने 189 धावा केल्या आहे, विशेष म्हणजे 2 सामन्यांत संघाला विजय मिळवून दिला आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 13, 2020, 10:48 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading