IPL 2020 : IPLच्या लिलावाआधी झाला अश्विनचा फैसला! 'या' संघात मिळाली जागा

IPL 2020 : IPLच्या लिलावाआधी झाला अश्विनचा फैसला! 'या' संघात मिळाली जागा

काही काळापासून दिल्ली कॅपिटल्सचा संघ अश्विनला संघात सामिल करणार होता अशा चर्चा होत्या.

  • Share this:

मुंबई, 15 ऑक्टोबर : आयपीएल 2020 एप्रिल-मे महिन्यात होणार असली तरी, या स्पर्धेसाठी तयारीला सुरुवात झाली आहे. डिसेंबरमध्ये आयपीएलच्या या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. मात्र त्याआधीच खेळाडूंला रिलिज करण्याचे प्रकार सुरू झाले आहे. यासाठी एक नाव बऱ्याच दिवसांपासून आघाडीवर होते, ते नाव म्हणजे फिरकीपटू आर. अश्विनचे. अश्विन 2018पासून किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार आहे. मात्र काही काळापासून दिल्ली कॅपिटल्सचा संघ अश्विनला संघात सामिल करणार होता अशा चर्चा होत्या. मात्र आता अश्विन आपल्या संघासोबत राहणार अशी चिन्हे आहेत.

किंग्ज इलेव्हन पंजाबचे मालक प्रिती झिंटा आणि नेस वाडिया यांनी खेळाडूंच्या अदलाबदलीमध्ये अश्विनला दिल्ली कॅपिटल्स संघाकडे न सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान नव्यानं नियुक्त करण्यात आलेले कोच अनिल कुंबळे यांनी अश्विनला पंजाब संघातच कायम ठेवण्याचा प्रस्ताव मांडला होता. याबाबत नेस वाडिया यांनी, "बोर्डनं संपूर्ण विचार करून असा निर्णय घेतला आहे की, अश्विन संघाचा महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. त्यामुळं खेळाडूंच्या अदलाबदलीमध्ये अश्विनला दुसऱ्या संघात देऊन पंजाबचे नुकसान आम्ही करणार नाही", असे सांगितले.

वाचा-ICCने क्रिकेटमधील सर्वात वादग्रस्त नियमात केला बदल; आता होणार नाही अन्याय!

पंजाबच्या संघानं अश्विनला 7.6 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले होते. त्याचबरोबर 2018 आणि 2019मध्ये नेतृत्व केले होते. गेल्या दोन हंगामांपासून पंजाब संघाचे नेतृत्वा आर. अश्विनकडे आहे. दरम्यान दोन्ही पर्वात पंजाब संघाला अंतिम चारमध्ये स्थान मिळाले नाही. त्यामुळं अश्विनचा डच्चू देण्यात येईल अशा चर्चा होत्या, मात्र असे काही नसल्याचे वाडिया यांनी स्पष्ट केले आहे.

वाचा-खेळाडूंचा पासिंग द पार्सल! क्रिकेटच्या इतिहासातला सर्वात विचित्र कॅच, पाहा VIDEO

दरम्यान अशा चर्चा होत्या की पुढच्या सत्रात अश्विनला दिल्ली कॅपिटल्ससोबत ट्रेड केले जाणार होते, त्यासाठी दिल्लीशी चर्चाही सुरू होती. मात्र कुंबळे यांनी संघाशी चर्चा केल्यानंतर अश्विनला रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या अश्विन भारतीय संघाचा भाग असून दक्षिण आफ्रिका विरोधात कसोटी मालिका खेळत आहे. अश्विननं दोन कसोटी सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत. यातील पहिल्या डावात सात विकेट घेत त्यानं अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहे.

वाचा-आता दरवर्षी होणार टी-20चा थरार, क्रिकेट चाहत्यांसाठी ICCने घेतला मोठा निर्णय

VIDEO : धावत्या लोकलमधून चोरानं हिसकावला मोबाईल, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 11:26 AM IST

ताज्या बातम्या