अबु धाबी, 9 नोव्हेंबर : आयपीएल-2020मध्ये (IPL Final 2020) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitlas) असा अंतिम सामना होणार आहे. मुंबईकडून पहिला क्वालिफायर सामना गमावल्यानंतर दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीनं सनरायजर्स हैदराबादचा (SRH) 17 धावांनी पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना शिखर धवनच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दिल्लीनं हैदराबादपुढे 190 धावांचे आव्हान ठेवले. मात्र दिल्लीला डेव्हिड वॉर्नरच्या रुपानं दुसऱ्या ओव्हरला मोठं यश मिळालं. इथेच हैदराबादला पराभव दिसला होता. मात्र त्यानंतर केन विल्यम्सन आणि अब्दुल समद यांनी महत्त्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी केली. विल्यम्सननं संघाला विजयाच्या जवळ पोहचवले होते. मात्र 17व्या ओव्हरमध्ये विल्यम्सन 45 चेंडूत 67 धावा करत बाद झाला. मात्र हैदराबादनं खरा सामना गमावला तो 19व्या ओव्हरमध्ये.
वाचा-IPL 2020 : फायनलमध्ये दोन मुंबईकर भिडणार! पाहा मुंबईचं रेकॉर्ड भारी का दिल्लीचं
19व्या ओव्हरमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरनं आपला हुकुमी एक्का असलेल्या कागिसो रबाडाच्या हाती चेंडू दिला आणि त्यानंही कर्णधाराला निराश केले नाही. रबाडाच्या दुसऱ्याच चेंडूवर समदनं षटकार लगावला. त्यावेळी हैदराबादला 10 चेंडूत 23 धावांची गरज होती. अशा परिस्थितीत पुढच्याच चेंडूवर रबाडानं समदला बाद केले. 16 चेंडूत 33 धावा करत समद बाद झाला. त्यानंतर लागोपाट हैदराबादला रबाडानं दुसरा झटका दिला. पुढच्याच चेंडूवर राशिद खानही बाद झाला. हॅटट्रिकवर असलेल्या रबाडानं पाचवा चेंडू व्हाइड टाकला आणि पुढच्य़ा चेंडूवर गोस्वामीला शून्यावर बाद केले. या एका ओव्हरमध्ये हैदराबादनं 3 विकेट गमावल्या.
वाचा-IPL 2020 : हैदराबादला हरवत दिल्लीची फायनलमध्ये धडक, आता मुंबईशी महामुकाबला
Three wickets in an over for @KagisoRabada25 and that may well be that!
Live - https://t.co/WGpwP2BIui #Dream11IPL #Qualifier2 pic.twitter.com/cujtLDoAaf
— IndianPremierLeague (@IPL) November 8, 2020
वाचा-IPL 2020 : मॅचच्या आधी रहाणेला जडेजासोबत पाहून शिखर धवनची सटकली!
या एका ओव्हरसर रबाडानं पर्पल कॅपवर आपले नाव कोरले. रबाडानं 29 विकेट घेतल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर 27 विकेटसह मुंबई इंडियन्सचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे. त्यामुळे 10 नोव्हेंबररोजी केवळ मुंबई-दिल्ली यांच्यातच नाही तर रबाडा विरुद्ध बुमराह असाही सामना पाहायला मिळेल.