IPL 2020 : मुंबईच्या विजयासाठी रोहित शर्मा सोडणार स्वत:ची जागा?

IPL 2020 : मुंबईच्या विजयासाठी रोहित शर्मा सोडणार स्वत:ची जागा?

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात मुंबई (Mumbai Indians)ची कामगिरी शानदार झाली आहे. आता मुंबईची टीम गुरुवारी दिल्ली (Delhi Capitals)विरुद्ध पहिली क्वालिफायर मॅच खेळणार आहे.

  • Share this:

दुबई, 4 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात मुंबई (Mumbai Indians)ची कामगिरी शानदार झाली आहे. आता मुंबईची टीम गुरुवारी दिल्ली (Delhi Capitals)विरुद्ध पहिली क्वालिफायर मॅच खेळणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून 10 नोव्हेंबरला होणाऱ्या प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न मुंबईचा असेल. मुंबईची कामगिरी बघता ते फायनल गाठतील, असं बोललं जात आहे. पण मुंबईसाठी दिल्लीचं आव्हान एवढं सोपं असणार नाही.

दिल्लीने या मोसमात चमकदार कामगिरी केली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात गुरुवारी दिल्लीची टीम मैदानात उतरेल, पण या मॅचसाठी रोहित शर्मा कर्णधार म्हणून मोठा निर्णय घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रोहित शर्माने हा निर्णय घेतला, तर मुंबई फायनलमध्ये थेट प्रवेश करू शकते. पण यासाठी रोहित शर्माला बलिदान करावं लागणार आहे.

रोहित ओपनिंग सोडणार?

रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या चतूर नेतृत्वामुळेच मुंबईने सर्वाधिक 4 वेळा आयपीएलवर आपलं नाव कोरलं आहे. कोणताही निर्णय घेताना रोहित पहिले टीमचा विचार करतो, मग स्वत:चा. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या या मॅचआधीही रोहित त्याच्या ओपनिंग बॅटिंगविषयी विचार करु शकतो. रोहित शर्मा ओपनिंगला आला नाही, तर टीमसाठी त्याचा फायदा होऊ शकतो.

रोहित शर्माला या मोसमात बॅटने चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्याने 10 मॅचमध्ये फक्त 26.40च्या सरासरीने 264 रन केले आहेत. रोहितच्या बॅटमधून या मोसमात फक्त 2 अर्धशतकं झाली आहेत.

रोहितऐवजी इशान किशन ओपनिंगला?

रोहित शर्माला दुखापत झाली तेव्हा मुंबईने इशान किशन (Ishan Kishan) ला ओपनिंगची संधी दिली. इशान किशननेही या संधीचं सोनं केलं आणि एकट्याच्या जीवावरच मुंबईला मॅच जिंकवून दिल्या. ओपनर म्हणून खेळताना इशान किशनने नाबाद 68, 37, 25 आणि नाबाद 72 रनची खेळी केली. ओपनिंगला खेळताना इशान किशनची सरासरी 100 पेक्षाही जास्त आहे. 11 मॅचमध्ये 47.55च्या सरासरीने 428 रन केले आहेत. इशान किशनने या मोसमात सर्वाधिक 26 सिक्सही लगावल्या आहेत.

दिल्लीविरुद्धच्या क्वालिफायर एकमध्ये इशान किशन जर पहिल्या क्रमांकावर बॅटिंगला उतरला, तर रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. पण मुंबई हा निर्णय घेणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Published by: Shreyas
First published: November 4, 2020, 10:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या