दुबई, 06 नोव्हेंबर : पाचव्यांदा आयपीएल (IPL 2020 Final) गाठणारा मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पहिला संघ ठरला आहे. गुरुवार झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात (Qualifier 1 MI vs DC) सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्लीचा 57 धावांनी पराभव केला. मात्र मुंबई इंडियन्सच्या आनंदावर विरजण पडलं आहे. दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्ट जखमी झाला. बोल्टला ग्रोइंन इंजरी झाली आहे. त्यामुळे बोल्ट केवळ दोन ओव्हर टाकू शकला. दरम्यान 10 नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्याआधी बोल्ट फिट होणार का हे पाहावे लागणार आहे.
दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात बोल्टनं पहिल्या ओव्हरमध्ये दोन विकेट घेतले. दुसऱ्या चेंडूवर पृथ्वी शॉला शून्यावर बाद केले. त्याच ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर बोल्टनं अजिंक्य रहाणेला शून्यावर बाद केले. बोल्ट आणि बुमराह यांच्या जोडीपुढे फलंदाज टिकत नाही, असे असताना बोल्ट फायनलला नसल्यास हा मुंबईसाठी मोठा झटका असेल. दिल्लीविरुद्ध दोन ओव्हर केल्यानंतर बोल्ट मैदानात दिसला नाही. त्यानं दोन ओव्हरमध्ये 9 धावा देत 2 विकेट घेतल्या. या हंगामात बोल्ट एक घातक गोलंदाज ठरत आहे.
वाचा-20 ओव्हर सोडा मुंबईनं दिल्लाला 8 चेंडूतच हरवलं होतं, पाहा VIDEO
🗣️ Hitman explains how crucial Boult is with the new ball ⚡#OneFamily #MumbaiIndians #Dream11IPL #Believe👊🏼 @ImRo45 @trent_boult pic.twitter.com/HeZGzLdVv7
— Mumbai Indians (@mipaltan) November 6, 2020
वाचा-IPL 2020 : असं आहे मुंबईचं आयपीएल फायनलमधलं रेकॉर्ड
बोल्टच्या दुखापतीबाबत रोहितनं दिली माहिती
सामना संपल्यानंतर झालेल्या प्रेसेंटेशनमध्ये कर्णधर रोहित शर्मानं बोल्टच्या दुखापतीबाबत माहिती दिली. रोहित म्हणाला की, "मी बोल्टला पाहिले नाही आहे, पण तो ठीक आहे. आमच्यासमोर आता फायनलचं आव्हान आहे. याआधी आम्हाला तीन-चार दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे बोल्ट मैदानाबाहेर बसेल असे वाटत नाही". बोल्टनं या हंगामात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे तो संघात नसेल तर मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा झटका असेल.