स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020, Qualifier 1: ‘मी माझ्या संघाबाबत...’, मुंबईविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतर भडकला श्रेयस अय्यर

IPL 2020, Qualifier 1: ‘मी माझ्या संघाबाबत...’, मुंबईविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतर भडकला श्रेयस अय्यर

अंतिम सामना गाठण्यासाठी दिल्लीला आणखी एक संधी मिळणार आहे. क्वालिफायर-2 मध्ये दिल्लीचा मुकाबला आज RCB आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील एलिमिनेटर विजेत्या संघासोबत होईल.

  • Share this:

दुबई, 06 नोव्हेंबर : पाचव्यांदा आयपीएल (IPL 2020 Final) गाठणारा मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पहिला संघ ठरला आहे. गुरुवार झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात (Qualifier 1 MI vs DC) सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्लीचा 57 धावांनी पराभव केला.

मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याला सुरुवातीला वाटलं होतं की की त्याच्या संघाचं सामन्यावर नियंत्रण आहे. मात्र फलंदाजीमध्ये मुंबईने दमदार कमबॅक करत 5 बाद 200 धावांपर्यंत स्कोअर उभा केला.

पोस्ट-मॅच प्रेझेंटेशनमध्ये श्रेयस म्हणाला, "हे खूप कठीण होतं. माझ्या संघाबद्दल मला काही नकारात्मक बोलायचं नाही, पण इथून पुढे आम्हाला एक दृढ मानसिकता ठेवूनच मैदानात उतरावं लागेल." दिल्ली कॅपिटल्स आपल्या शेवटच्या 5 सामन्यांपैकी 4 मध्ये पराभूत झाला आहे. विजयाची गती मिळायला काय करणार असं विचारल्यावर श्रेयस म्हणाला, ‘मनात दृढ विश्वास ठेवायला हवा.’ दरम्यान, अंतिम सामना गाठण्यासाठी दिल्लीला आणखी एक संधी मिळणार आहे. क्वालिफायर-2 मध्ये दिल्लीचा मुकाबला आज RCB आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील एलिमिनेटर विजेत्या संघासोबत होईल.

वाचा-20 ओव्हर सोडा मुंबईनं दिल्लाला 8 चेंडूतच हरवलं होतं, पाहा VIDEO

मुंबईविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलताना तो म्हणाले, "सामन्याच्या सुरुवातीला आम्ही पटकन दोन विकेट घेतल्या होत्या 13 किंवा 14 व्या ओव्हरमध्ये त्यांची अवस्था 4 बाद 101 धावा होती. तेव्हा सामन्यावर आमची पकड होती असं मला वाटतं तेव्हाच आम्ही मुंबईवर आणखी दबाव आणू शकलो असतो. जर आम्ही आणखी 2 विकेट्स घेतल्या असत्या तर त्यांचा स्कोअर नक्कीच 170 पर्यंत असता आणि तो लक्ष्य आम्ही गाठू शकलो असतो. पण खेळात असं होतच राहतं, सगळेच दिवस आपले नसतात."

वाचा-IPL 2020 : असं आहे मुंबईचं आयपीएल फायनलमधलं रेकॉर्ड

‘संघानं केलेल्या प्रयत्नांवर खूश’

कर्णधार श्रेयस म्हणाला की, "आम्हाला ही स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली त्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. आपल्या खेळाबद्दल चांगली मानसिकता असणं गरजेचं आहे. संपूर्ण स्पर्धेत जिंकतच राहणे कठीण आहे, आम्ही केलेली तयारी आणि आम्ही घेतलेल्या मेहनतीमुळे आम्ही निकालाचा तितकासा विचार करत नाही. आम्ही पुरेपूर सराव आणि तयारी केली होती. सामन्यात हार-जीत होतच असते. गेल्या 14 सामन्यांमध्ये माझ्या संघाने केलेल्या प्रयत्नांवर मी खूप खुश आहे." तर, मुंबईच्या संघाबद्दल बोलताना तो म्हणाला, "त्यांचे सर्वच फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. विशेषतः हार्दिक आणि पोलार्ड तळाला उत्तम फलंदाजी करत आहेत. तरीही आम्ही कोणत्याही परिस्थितीत असलो तरीही आम्हाला सकारात्मक राहणं आवश्यक आहे."

वाचा-IPL 2020 : मुंबईच्या बॉलरकडून दिल्लीची दाणादाण, 11 वर्षातला नकोसा रेकॉर्ड

बुमराहची जबरदस्त गोलंदाजी

जसप्रीत बुमराहनं या सामन्यात मॅच विनिंग कामगिरी केली. 4 ओव्हरमध्ये केवळ 14 धावा देत त्यानं 4 विकेट घेतल्या. आयपीएलमधली दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम बॉलिंग स्पेल आहे. या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर चेन्नईचा बॉलिंजर आहे, त्यानं 13 धावा देत 4 विकेट घेतल्या होत्या. तर दुसऱ्या क्रमांकावर धवल कुलकर्णी आणि बुमराह आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: November 6, 2020, 12:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading