स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020, Qualifier 1: 20 ओव्हर सोडा मुंबईनं दिल्लाला 8 चेंडूतच हरवलं होतं, विश्वास बसत नसेल तर पाहा VIDEO

IPL 2020, Qualifier 1: 20 ओव्हर सोडा मुंबईनं दिल्लाला 8 चेंडूतच हरवलं होतं, विश्वास बसत नसेल तर पाहा VIDEO

पहिल्या 8 चेंडूतच श्रेयस अय्यरला दिसला होता पराभव, पाहा मुंबई इंडियन्सच्या जबरदस्त गोलंदाजीचा VIDEO

  • Share this:

दुबई, 06 नोव्हेंबर : पाचव्यांदा आयपीएल (IPL 2020 Final) गाठणारा मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पहिला संघ ठरला आहे. गुरुवार झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात (Qualifier 1 MI vs DC) सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्लीचा 57 धावांनी पराभव केला. मुंबईनं दिलेल्या 201 धावांचे लक्ष दिल्लीचा गाठता आले नाही. मुंबईनं गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या 8 चेंडूतच दिल्लीला मुंबईने पराभूत केले होते. दरम्यान, अंतिम सामना गाठण्यासाठी दिल्लीला आणखी एक संधी मिळणार आहे. क्वालिफायर-2 मध्ये दिल्लीचा मुकाबला आज RCB आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार एलिमिनेटर विजेत्या संघासोबत होईल.

प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 201 धावांचे लक्ष्य दिल्लीपुढे ठेवले. मात्र हे आव्हान पार करताना दिल्लीची हालत खराब झाली. ट्रेंट बोल्टनं पहिल्याच ओव्हरमध्ये पृथ्वी शॉला शून्यावर बाद केले. त्याच ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर बोल्टनं अजिंक्य रहाणेला शून्यावर बाद केले. पहिल्या ओव्हरमध्ये शून्यावर दिल्लीच्या दोन विकेट होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहित शर्माला बुमराहला घेऊन आला. बुमराहनं दुसऱ्या चेंडूवरच शिखर धवनला बाद तेले. केवळ 8 चेंडूंवर दिल्लीनं 3 विकेट गमावल्या होत्या.

वाचा-IPL 2020 : असं आहे मुंबईचं आयपीएल फायनलमधलं रेकॉर्ड

20 धावांवर होत्या 4 विकेट

3 फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर दिल्लीची जबाबदारी कर्णधार श्रेयस अय्यरवर होती. 3 चौकार लगावत दिल्लीला अय्यरनं आशा दाखवल्या, मात्र बुमराहनं चौथ्या ओव्हरमध्ये अय्यरलाही माघारी धाडलं. केवळ 12 धावा करत अय्यर बाद झाला. 20 धावांवर दिल्लीनं 4 विकेट गमावल्या होत्या.

वाचा-IPL 2020 : मुंबईच्या बॉलरकडून दिल्लीची दाणादाण, 11 वर्षातला नकोसा रेकॉर्ड

बुमराहची जबरदस्त गोलंदाजी

जसप्रीत बुमराहनं या सामन्यात मॅच विनिंग कामगिरी केली. 4 ओव्हरमध्ये केवळ 14 धावा देत त्यानं 4 विकेट घेतल्या. आयपीएलमधली दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम बॉलिंग स्पेल आहे. या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर चेन्नईचा बॉलिंजर आहे, त्यानं 13 धावा देत 4 विकेट घेतल्या होत्या. तर दुसऱ्या क्रमांकावर धवल कुलकर्णी आणि बुमराह आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: November 6, 2020, 10:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading