Home /News /sport /

ड्रेसिंग रूममधल्या ‘त्या’ फोटोमुळे पृथ्वी शॉवर भडकले चाहते, पाहा नेमकं काय घडलं

ड्रेसिंग रूममधल्या ‘त्या’ फोटोमुळे पृथ्वी शॉवर भडकले चाहते, पाहा नेमकं काय घडलं

चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यात शून्यावर आउट होऊन त्यांनी ड्रेसिंग रूममध्ये असं काही केलं ज्याने सोशल मीडियावर फॅन्सने त्याला जबरदस्त ट्रोल केलं.

  शारजा, 19 ऑक्टोबर : सध्या सुरू असणाऱ्या Dream11 IPL टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सर्व सामने रंगतदार होत आहेत. असाच एक सामना शनिवारी (17 ऑक्टोबर) रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये रंगला. चेन्नई सुपर किंग्सने पहिल्यांदा फलंदाजी करून 180 धावांचं भक्कम लक्ष्य दिल्ली कॅपिटल्ससमोर उभं केलं. दिल्लीकडून या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी फलंदाज जोडी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांची आली. पृथ्वी शॉने अगदी पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला एक साधासा शॉट मारला आणि गोलंदाज दीपक चाहरने एक सोपा कॅच पकडून शॉला शून्यावर माघारी धाडले. आपल्या कर्तृत्व आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर अंडर-19 वर्ल्ड-कप भारतासाठी जिंकून आणणाऱ्या पृथ्वी शॉची फलंदाजी यावर्षी IPL मध्ये काही खास रंगत आणताना दिसली नाही. त्यात या सामन्यात शून्यावर आउट होऊन त्यांनी ड्रेसिंग रूममध्ये असं काही केलं ज्याने सोशल मीडियावर फॅन्सने त्याला जबरदस्त ट्रोल केलं. वाचा-अमित मिश्राच्या जागी दिल्लीनं आणला हुकुमी एक्का, 'या' गोलंदाजाला घेतलं संघात Sorry I was too much hungry, and I was not eating a “Duck”. वाचा-ठरलं! 'या' दोन संघांमध्ये होणार IPL फायनल, युवीच्या भविष्यवाणीनं घाबरली RCB
  दुसऱ्या इनिंगच्या तिसऱ्या ओव्हरला जेव्हा दिल्ली कॅपिटल्सने पहिलीच विकेट गमावली होती आणि त्यांचा स्कोर 1 बाद 13 धावा असा होता तेव्हा एका कॅमेरामनने आपला कॅमेरा दिल्लीच्या ड्रेसिंगरूमकडे नेला आणि कॅमेरामध्ये पृथ्वी शॉ मस्तपैकी जेवताना दिसला. हे दृश्य पाहून फॅन्सने सोशल मीडियावर पृथ्वीला ट्रोल केलं. ट्रोलरनी काही खोचक आणि गमतीदार प्रतिक्रिया दिल्या. अगदीच शॉ वर हास्यदपद कमेंट्स आणि मिम्स चा पाऊस पाडला. वाचा-40 ओव्हरचा सामना 12 चेंडूत संपला! फक्त 6 मिनिटांत पाहा डबल सुपर ओव्हरचा थरार 'इथे टीमची परिस्थिती बिकट करून दुसरीकडे बुफे मधलं जेवण जेवण्यासाठी पृथ्वी शॉने धाव घेतली', असं म्हणत काही फॅन्सनी शॉवर टीका केली. पृथ्वी डकवर का आउट झाला याची कारणं वेगवेगळ्या ट्विटमधून लोक मांडत होते. ‘पहिल्या इनिंगनंतर ड्रेसिंग रूममध्ये पाहिलेल्या पक्वानांनंतर मी स्वत: ला कसं रोखू शकेन?’, कोचनी विचारलं, ‘आज शून्यावर का आउट झालास? चेंडू अवघड होता का?’ पृथ्वी- नाही तो बुफे स्वादिष्ट होता म्हणून.’ अशा प्रतिक्रिया त्यात होत्या. पहिली प्रतिक्रिया पडल्यानंतर आयपीएल 2020 या अनधिकृत हँडलवरून पृथ्वीनी दिलेली प्रतिक्रियाही हलकीफुलकी होती ‘सॉरी, मला खूप भूक लागली होती आणि मी ‘डक’ म्हणजे बदक खात नव्हतो.’ वाचा-6 सामने गमावूनही पंजाब गाठणार प्ले ऑफ? पॉइंट टेबलमध्ये झाला मोठा बदल या सर्व प्रकारानंतर खरी मजा तर सामन्याच्या शेवटी आली. शिखर धवनने सामन्याची धुरा आपल्या हाती घेऊन IPL मधील त्याचं पहिलं शतक ठोकलं. पण शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावांची गरज असताना जणू धवनचे शतक आणि मेहनत वाया जाते की काय असं वाटू लागलं. अक्षर पटेलने हे सर्व सिद्धांत खोटे पडून रवींद्र जडेजाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये तीन दणदणीत षटकार मारून दिल्लीला यश मिळवून दिलं.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Prithvi Shaw

  पुढील बातम्या