मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

गांगुलीने तयार केला IPLचा ‘प्लॅन बी’, नव्या वेळापत्रकाप्रमाणे असे होऊ शकतात सामने

गांगुलीने तयार केला IPLचा ‘प्लॅन बी’, नव्या वेळापत्रकाप्रमाणे असे होऊ शकतात सामने

कोरोनाव्हायरसमुळे आयपीएल दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळं 29 मार्चपासून सुरू होणारी स्पर्धा आता 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे.

कोरोनाव्हायरसमुळे आयपीएल दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळं 29 मार्चपासून सुरू होणारी स्पर्धा आता 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे.

कोरोनाव्हायरसमुळे आयपीएल दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळं 29 मार्चपासून सुरू होणारी स्पर्धा आता 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
मुंबई, 13 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे (CoronaVirus) साऱ्या जगावर संकट आले आहे. अशा परिस्थितीत विविध कार्यक्रम आणि क्रिकेटचे सामनेही रद्द करण्यात आले आहेत. यातच भारतातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएलवरही कोरोनाचे संकट आहे. कोरोनाव्हायरसमुळे आयपीएल दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळं 29 मार्चपासून सुरू होणारी स्पर्धा आता 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य सल्लागारांची चर्चा केल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या भारत सरकारने 15 एप्रिलपर्यंत सर्व व्हिसा निलंबित केले आहेत. त्यामुळे विदेशी खेळाडू भारतात 15 एप्रिलनंतर येऊ शकतात. इंडियन प्रीमियर लीग आयोजित करण्यासाठी आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलची शनिवारी 14 मार्च रोजी बैठक होणार होती, ज्यामध्ये आठही मताधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. पण त्याआधी बीसीसीआयने सुमारे दोन आठवड्यांसाठी लीगला पुढे नेण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी दिल्ली सरकारनेही इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यांना बंदी घातली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पुढील आदेश येईपर्यंत आयपीएलवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. त्याचवेळी कर्नाटक सरकारनेही आयपीएलचे आयोजन करण्यास माघार घेतली, तर महाराष्ट्र सरकारने तिकिटांच्या विक्रीवर बंदी घातली. वाचा-BREAKING: कोरोनामुळे IPL लांबणीवर, 29 मार्चऐवजी 15 एप्रिलपासून सुरू होणार दुसरीकडे आयपीएलचा वेळेपत्रक जाहीर झाल्यानंतर ते 50 दिवसांसाठी होते, मात्र आता 15 दिवस आयपीएलचा हा हंगाम पुढे गेल्यामुळे वेळेपत्रकात बदल होऊ शकतात. यासाठी गांगुलीने प्लॅन बी तयार केला असल्याची शक्यता आहे. आयपीएल पुढे ढकलल्यास काय होईल? आयपीएलचा तेरावा हंगाम याआधी 29 मार्च ते 24 मे असा 50 दिवसांसाठी आयोजित करण्यात आला होता. मात्र आता 15 एप्रिलपासून सामने सुरू झाल्यानंतर पुढे दिवस वाढवता येणार नाही. बीसीसीआयला 24 मेपर्यंत हा हंगामा संपवणे बंधनकारक आहे. कारण आयपीएलनंतर लगेचच भारताला आशिया चषक, विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धा आहेत, त्यामुळे स्पर्धा जास्त काळ पुढे ढकलता येणार नाही. वाचा-IPLमध्ये कोहलीच्या संघात खेळणाऱ्या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण असा असेल गांगुलीचा प्लॅन सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या तेराव्या हंगामात एकूण 8 संघ आहेत. त्यामुळं 8 संघाचे 4 गट केले जाऊ शकतात. त्यानंतर या गटांमध्ये प्रत्येकी 6 सामने होतील. म्हणजे एकूण 24 गट सामने होतील. त्यानंतर 2 संघांमध्ये उपांत्य पूर्व, एक अंतिम सामना आणि एक सामना चौथ्या क्रमांकासाठी होईल. म्हणजे एकूण 28 सामने होतील, हे सामने 24 मेपर्यंत आयोजित केले जाऊ शकतात. त्याचबरोबर, खेळाडूंचे प्रवास थांबवण्यासाठी प्रत्येक संघाच्या होमग्राउंडवर सामने आयोजित केले जाणार नाहीत. तसेच, याआधी केवळ रविवारी दोन सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. आता सामने पुढे ढकलल्यामुळे शनिवारीही दोन सामन्यांचे आयोजन केले जाऊ शकते. वाचा-भारत सरकारच्या एका निर्णयामुळे 60 खेळाडू IPL ला मुकणार, BCCI ला मोठा फटका? प्रेक्षकांशिवाय होणार IPL? स्टेडियममध्ये होणाऱ्या तिकिट विक्रीतून कोणत्याही संघाला 8 ते 10 कोटी रुपये मिळतात. ही कमाई खूपच कमी आहे आणि बीसीसीआय याची भरपाई करू शकते. फक्त एक टक्के लोक आयपीएल बघायला स्टेडियममध्ये उपस्थित राहतात. बाकी सर्व चाहते टीव्ही किंवा मोबाइलवरून आयपीएल बघतात. त्यामुळेच कोरोनामुळे आयपीएल टाळल्यास प्रसारण करणाऱ्या कंपन्यांना मोठं नुकसान होऊ शकतं. तसेच संघ मालकांनाही मोठा आर्थिक दणका बसेल.
First published:

Tags: Corona virus, Cricket, IPL 2020, Sourav ganguly

पुढील बातम्या