Home /News /sport /

IPL Point Table : 6 सामन्यातच IPL 2020 मधून बाहरे पडला 'हा' संघ! प्ले ऑफमध्ये जागा मिळवणं अशक्य

IPL Point Table : 6 सामन्यातच IPL 2020 मधून बाहरे पडला 'हा' संघ! प्ले ऑफमध्ये जागा मिळवणं अशक्य

गुणतालिकेत (IPL 2020 Pointable) पहिल्या 4 मध्ये येण्यासाठी सर्व संघाचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना 6 सामन्यातच एका संघाचे आयपीएल जिंकण्याचे स्वप्न जवळजवळ तुटले आहे.

    दुबई, 09 ऑक्टोबर : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामात आतापर्यंत प्रत्येक संघाचे 5 ते 6 सामने झाले आहेत. त्यामुळे आता प्ले ऑफसाठी शर्यत सुरू झाली आहे. गुणतालिकेत (IPL 2020 Pointable) पहिल्या 4 मध्ये येण्यासाठी सर्व संघाचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना 6 सामन्यातच एका संघाचे आयपीएल जिंकण्याचे स्वप्न जवळजवळ तुटले आहे. हा संघ आहे किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab). पंजाबचा हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात 69 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पंजाबचा संघ गुणतालिकेत अतिंम स्थानी आहे. पंजाबनं 6 सामन्यात केवळ 1 सामना जिंकला आहे. तर 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबकडे सध्या केवळ 2 गुण आहेत. तर त्यांना नेट रन रेटही -0.431 आहे. त्यामुळे आता पंजाबला प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी सर्व सामने जास्त फरकाने जिंकावे लागतील. प्ले ऑफ गाठण्यासाठी संघांना 16 गुणांची गरज असते. वाचा-IPL 2020 : पंजाबची हाराकिरी सुरूच, आता हैदराबादने धुव्वा उडवला गुणतालिकेत नजर टाकल्यास 8 गुणांसह सध्या मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. तर, दिल्लीचेही 8 गुण आहेत. मात्र नेट रन रेटनं दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज दिल्लीचा मुकाबला राजस्थानशी आहे. त्यामुळे या सामन्यात दिल्लीला गुणतालिकेत अव्वल येण्याची संधी आहे. तर, 6 गुणांसह सनरायझर्स हैदराबाद तिसऱ्या आणि कोलकाता नाइट रायडर्स चौथ्या क्रमांकावर आहेत. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचेही 6 गुण आहेत. वाचा-IPL 2020 : वॉर्नर झाला आयपीएलमधला सगळ्यात 'महान' खेळाडू वाचा-IPL 2020 : अश्विनकडून 'त्या' खेळाडूंची चोरांशी तुलना चेन्नई आणि राजस्थानला विजयाची गरज चेन्नई (Chennai Super Kings) च्या टीमने आतापर्यंत त्यांनी खेळलेल्या प्रत्येक मोसमात प्ले-ऑफ गाठलं आहे. यंदा मात्र त्यांचा प्रवास खडतर सुरू आहे. चेन्नई (CSK) ने या मोसमात खेळलेल्या 6 पैकी 4 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे, तर त्यांना 2 मॅचच जिंकता आल्या आहेत. 16 गुण मिळवून प्ले-ऑफ गाठण्यासाठी चेन्नईला उरलेल्या 8 मॅचपैकी 6 मॅच जिंकाव्या लागतील. तर, राजस्थाननं 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यांनाही 8 पैकी 6 सामने जिंकणे गरजेचे आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या