मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL Point Table : फक्त 13 सामने बाकी, टॉप-4 साठी स्पर्धा जोरदार! पाहा तुमचा आवडता प्ले ऑफ गाठणार का?

IPL Point Table : फक्त 13 सामने बाकी, टॉप-4 साठी स्पर्धा जोरदार! पाहा तुमचा आवडता प्ले ऑफ गाठणार का?

प्ले ऑफ गाठण्यासाठी सर्व संघांकडे केवळ 13 सामने आहेत. प्ले ऑफच्या शर्यतीत मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर यांची जागा निश्चित आहे.

प्ले ऑफ गाठण्यासाठी सर्व संघांकडे केवळ 13 सामने आहेत. प्ले ऑफच्या शर्यतीत मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर यांची जागा निश्चित आहे.

प्ले ऑफ गाठण्यासाठी सर्व संघांकडे केवळ 13 सामने आहेत. प्ले ऑफच्या शर्यतीत मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर यांची जागा निश्चित आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : आयपीएलमध्ये (IPL 2020) आतापर्यंत एकूण 43 सामने खेळले गेले आहेत. लीगमध्ये आता केवळ 13 सामने खेळणं बाकी आहेत. यामुळे आता प्ले ऑफ गाठण्यासाठी सर्व संघांकडे केवळ 13 सामने आहेत. प्ले ऑफच्या शर्यतीत मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर यांची जागा निश्चित आहे. CSK याआधीच प्ले ऑफ बाहेर गेला आहे. त्यामुळे सध्या स्पर्धा आहे ती हैदराबाद, पंजाब, कोलकाता आणि राजस्थान या संघांमध्ये. दुसरीकडे पंजाबनं हैदराबादला नमवत सलग चौथा विजय नोंदवला आहे. त्यामुळे गुणतालिकेत पंजाब 10 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. गुणतालिकेवर नजर टाकल्यास पहिल्या तीन संघांचे गुण 14 आहेत. मुंबईचा रनरेट जास्त असल्यामुळे सध्या हा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्लीचे अजून 3 सामने शिल्लक आहेत. तर मुंबई-बॅंगलोर संघ 4-4 सामने खेळती. या तीन संघांना एका विजयाची गरज आहे. वाचा-IPL 2020 : पंजाबने सोडून दिलं, पण आता हे 2 खेळाडू गाजवत आहेत आयपीएल KKR समोर मोठं आव्हान शनिवारी KKRvने दिल्लीला 59 धावांनी नमवत प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्याचे स्वप्न कायम ठेवलं आहे. कोलकातानं 11 सामन्यात 12 गुण मिळवत चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र त्यांचा रन रेट अजूनही -0.476मध्ये आहे. कोलकाताचे उरलेले सामने- किंग्स इलेव्हन पंजाब, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स वाचा-IPL 2020 : 127 रन करण्यातही हैदराबाद अपयशी, पंजाबचा रोमांचक विजय पंजाबला विजयाची गरज केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाबनं सलग चार सामने जिंकले आहे. हा संघ गुणतालिकेत 10 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. पंजाबनं उर्वरित 3 सामने जिंकल्यास ते प्ले ऑफ गाठू शकतात. पंजाबचे उरलेले सामने-कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हैदराबादचा प्रवास खडतर हैदराबादचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे. सलग पराभवामुळे हैदराबादचा प्रवास ख़डतर झाला आहे. हैदराबादनं 11 सामन्यात 8 गुण मिळवले आहे. त्यांच्यासाठी आता करो वा मरोची लढाई असणार आहे. उरलेले सामने- मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बॅगलोर वाचा-IPL 2020 : काल रात्री वडील गेले, आज मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरला राजस्थानसमोर आव्हान राजस्थान रॉयल्स संघाचेही प्ले ऑफ गाठणे कठिण आहे. त्यांनीही 11 सामन्यात 8 गुण मिळवले आहेत. उर्वरित 3 सामन्यात त्यांना विजय मिळवावा लागणार आहे. उरलेले सामने- मुंबई इंडियन्स, किंग्स इलेव्हन पंजाब , कोलकाता नाइट रायडर्स
First published:

पुढील बातम्या