मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL Point Table: पंजाबच्या विजयानं आता विराट आणि रोहितचीही चिंता वाढली! बदलली प्ले ऑफची समीकरणं

IPL Point Table: पंजाबच्या विजयानं आता विराट आणि रोहितचीही चिंता वाढली! बदलली प्ले ऑफची समीकरणं

किंग्ज इलेव्हन पंजाबची विजयी घौडदौड दिल्ली, मुंबई आणि बॅंगलोरसाठीही ठरणार धोक्याची ? पाहा कसा आहे Point Table

किंग्ज इलेव्हन पंजाबची विजयी घौडदौड दिल्ली, मुंबई आणि बॅंगलोरसाठीही ठरणार धोक्याची ? पाहा कसा आहे Point Table

किंग्ज इलेव्हन पंजाबची विजयी घौडदौड दिल्ली, मुंबई आणि बॅंगलोरसाठीही ठरणार धोक्याची ? पाहा कसा आहे Point Table

  • Published by:  Priyanka Gawde
शारजा, 27 ऑक्टोबर : आयपीएलच्या सुरुवातील गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबने (KXIP) जबरदस्त कमबॅक केला आहे. सलग पाचवा विजय मिळवत पंजाबचा संघ आता गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आला आहे. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाबनं 7 विकेटनं विजय मिळवला. तर, कोलकाता नाइट रायडर्सचा संघ 12 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. पंजाबच्या विजयानं सध्या कोलकाताच नाही तर टॉप-3 संघांचीही चिंता वाढली आहे. गुणतालिकेवर नजर टाकल्यास पहिल्या 3 संघांचे 14 गुण आहेत. मुंबई इंडियन्स टॉपवर तर दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीचा बॅंगलोर संघ आहे. मुख्य म्हणजे या तिन्ही संघांनी नुकतेच सामने गमावले आहे. त्यामुळे प्ले ऑफ गाठण्यासाठी आणि पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी या संघांना सामने जिंकावेच लागतील. या तिन्ही संघांचे 3-3 सामने शिल्लक आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबचा हा सलग पाचवा विजय आहे. यासह पंजाबचे 12 गुण झाले आहेत. -0.05 त्यांचा रन रेट आहे. पंजाबचे आणखी 2 सामने शिल्लक आहेत. त्यांनी हे दोन्ही सामने जिंकल्यास त्यांचे गुण 16 होतील. मात्र दिल्ली. मुंबई, बॅंगलोर यांनी सामने गमावल्यास त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. एवढेच नाही तर मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या क्रमांकावर राहण्यासाठी प्रयत्न करेल. कारण प्ले ऑफमध्ये अव्वल संघाला एलिमिनेटर खेळण्याची संधी मिळते. म्हणजे सामना गमावल्यानंतर त्यांना आणखी एक संधी मिळते. जर. पंजाबच्या संघानं एक सामना गमावला तर त्यांचे 14 गुण राहतील. म्हणजे असेही होऊ शकते की 7 संघांचे 14-14 गुण होतील, त्यावेळी नेट रन रेट महत्त्वाचा ठरेल. नेट रन रेट महत्त्वाचा जर प्ले ऑफचा निर्णय नेट रन रेटच्या आधारे झाला तर पंजाबला चिंतेचे कारण नाही. कारण त्यांचा रन रेट KKR पेक्षा जास्त आहे. मात्र हैदराबादचा रन रेट पंजाबपेक्षा जास्त आहे. त्यामुळे क्वालिफाय होण्यासाठी पंजाबला येते दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.
First published:

Tags: Kl rahul, Mumbai Indians

पुढील बातम्या