मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL Point Table : राजस्थानच्या पराभवानं उघडले धोनीचे दरवाजे, अशी गाठणार CSK प्ले ऑफ

IPL Point Table : राजस्थानच्या पराभवानं उघडले धोनीचे दरवाजे, अशी गाठणार CSK प्ले ऑफ

हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थानचा पराभव, CSKचा फायदा. अजूनही गाठू शकतात प्ले ऑफ; असं आहे गणित

हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थानचा पराभव, CSKचा फायदा. अजूनही गाठू शकतात प्ले ऑफ; असं आहे गणित

हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थानचा पराभव, CSKचा फायदा. अजूनही गाठू शकतात प्ले ऑफ; असं आहे गणित

  • Published by:  Priyanka Gawde

दुबई, 23 ऑक्टोबर : आयपीएलच्या तेरावा हंगाम (IPL 2020) आता प्ले ऑफच्या दिशेनं मजल मारत आहे. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitlas), मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर (Royal Challenges Banglore) या तीन संघांची प्ले ऑफ गाठणं निश्चित झालं आहे. मात्र चौथ्या क्रमांकासाठी अजूनही शर्यत सुरू आहे. गुरूवारी हैदराबाद विरुद्ध राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यानंतर चेन्नई, पंजाब आणि हैदराबाद या संघाच्या प्ले ऑफ गाठण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. धोनीचा संघ तळाशी असला तरी प्ले ऑफ गाठण्याची त्यांना एक संधी आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या CSK आतापर्यंत सर्व हंगामात प्ले ऑफ गाठण्याची कामगिरी केली आहे. मात्र पहिल्यांदाच हा संघ -0.463 रनरेटसह अंतिम स्थानी आहे. मात्र अजूनही धोनीला प्ले ऑफ गाठण्याची संधी आहे. CSK ला अजूनही 4 सामने खेळायचे आहे. यातील एक सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. तर इतर 3 सामने रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर, कोलकाता नाइट रायडर्स यांच्याविरुद्ध आहेत.

वाचा-IPL 2020 : मनिष पांडेला शंकरची साथ, हैदराबादचा राजस्थानवर विजय

वाचा-IPL 2020 : ...म्हणून क्रिकेटपटू दोन टोप्या घालून मैदानात दिसत आहेत

असं आहे गणित

>>चेन्नईला उरलेले चारही सामने जिंकावे लागणार आहेत.

>>त्याचबरोबर चेन्नईला आता मुंबई, बॅंगलोर आणि दिल्ली या संघांवर अवलंबुन राहावे लागेल. या संघानी सामने जिंकल्यास CSKला फायदा होईल.

>>चेन्नई चौथ्या क्रमांकावर येईल जर कोलकाता नाइट रायडर्स 4 पैकी केवळ एक सामना जिंकतील.

>> तसेच, हैदराबाद, पंजाब आणि राजस्थान दोन पेक्षा जास्त विजय न मिळवल्यास चेन्नईला फायदा होईल.

>> यासह चेन्नईचा संघ 14 गुणांसह प्ले ऑफ गाठेल. मात्र नेट रनरेट पाहिल्यास चेन्नईला उरलेले चारही सामने जास्त फरकाने जिंकावे लागतील.

वाचा-IPL 2020 : 'माझ्या यशामागे झहीर खान', मुंबईच्या बॉलरने दिलं श्रेय

मुंबईविरुद्ध सामना हरल्यास काय होणार?

आज मुंबईविरुद्ध चेन्नईचा सामना होणार आहे. दरम्यान, हा सामना गमावल्यास चेन्नईचा संघ स्पर्धेतून बाहेर होणार नाही. 12 गुणांसह चेन्नई प्ले ऑफ गाठू शकते. गेल्या वर्षी हैदराबादनं असेच केले होते. मात्र चेन्नईचा प्रवास सोपा नसेल, त्यांना इतर संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

First published: