मुंबई, 18 ऑक्टोबर : आयपीएलच्या (IPL 2020) या हंगामात आता सर्व संघ प्ले ऑफमध्ये (Play Off) जागा मिळवण्यासाठी उत्सुक आहे. गुणतालिकेतील (IPL Point Table 2020) पहिले 4 संघ प्ले ऑफमध्ये आपली जागा फिक्स करतील. यातील तीन संघ जवळजवळ निश्चित झाले आहेत. शनिवारी चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध (Chennai Super kings) विजय मिळवत दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)संघानं अव्वल स्थान पुन्हा मिळवलं आहे. 14 गुणांसह दिल्लीचा संघ सध्या पहिल्य़ा क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर 12 गुणांसह अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर संघ आहेत. त्यामुळे हे संघ प्ले ऑफ गाठणार हे निश्चित झाले आहे.
तर, चौथ्या क्रमांकावर कोलकाता नाइट रायडर्सचा संघ आहे. कोलकाताकडे 8 गुण आहेत. तर, सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई आणि राजस्थान या तीन संघाचे 6 गुण आहेत. तर, पंजाब संघाकडे 4 गुण आहेत. त्यामुळे प्ले ऑफ गाठण्यासाठी आता कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात स्पर्धा आहे.
वाचा-IPL 2020 : ब्रायन लारा म्हणतो, 'ही आहे आयपीएलची सर्वोत्तम टीम'
With 14 points, @DelhiCapitals are back on top in the points table after Match 34 of #Dream11IPL. pic.twitter.com/7HWXecn8sr
— IndianPremierLeague (@IPL) October 17, 2020
वाचा-IPL 2020 : सेहवाग म्हणतो, 'हा खेळाडू कोरोनाची लसही बनवू शकतो'
चेन्नई, राजस्थान, पंजाबच्या आशा धुसर
पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम सहाव्या क्रमांकावर आहे. चेन्नईने 9 मॅचपैकी 3 मॅच जिंकल्या आहेत, तर 5 मॅचमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे पहिल्यांदा चेन्नईचा संघ प्ले ऑफ गाठणार नाही. तर, पंजाबच्या आशा याआधीच मावळल्या आहेत. राजस्थानला संधी असली तरी त्यांचा नेट रन रेट कमी आहे.