IPL Point Table: ठरलं! 'हे' 4 संघ ठरणार प्ले ऑफसाठी पात्र; पाहा तुमची आवडची टीम आहे कोणत्या स्थानी

IPL Point Table: ठरलं! 'हे' 4 संघ ठरणार प्ले ऑफसाठी पात्र; पाहा तुमची आवडची टीम आहे कोणत्या स्थानी

IPL Point Table: प्ले ऑफसाठी पात्र होण्याकरिता संघांना 16 गुण मिळवणे बंधनकारक आहे. मात्र सध्याच्या गुणतालिकेवर नजर टाकल्यास तीन संघ या शर्यतीतून बाहेर पडल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.

  • Share this:

मुंबई, 11 ऑक्टोबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामात (IPL 2020) आता प्ले ऑफसाठी पहिल्या चार संघांमध्ये जागा मिळवण्याची शर्यत सुरू झाली आहे. सर्व संघाचे 6 सामने झाले आहेत. यानुसार कोणते चार संघ प्ले ऑफसाठी पात्र होणार आहेत, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. प्ले ऑफसाठी पात्र होण्याकरिता संघांना 16 गुण मिळवणे बंधनकारक आहे. मात्र सध्याच्या गुणतालिकेवर नजर टाकल्यास तीन संघ या शर्यतीतून बाहेर पडल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.

गुणतालिकेत सध्या पहिल्या क्रमांकासाठी दिल्ली कॅपिटल्स (delhi capitals)आणि मुंबई इंडियन्स (mumbai indians) यांच्यात स्पर्धा सुरू आहे. सध्या 10 गुणांसह दिल्लीचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. तर 8 गुणांसह मुंबईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज दिल्ली आणि मुंबई यांच्यात सामना होणार आहे. त्यामुळे आजचा सामना दिल्ली जिंकल्यास त्यांचा प्ले ऑफमध्ये प्रवेश निश्चित होईल. तर पंजाबविरुद्ध विजय मिळवल्यानंतर कोलकाताचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर बंगळुरूनं चेन्नईला नमवत चौथे स्थान पटकावले आहे. कोलकाता आणि बंगळुरू यांचे गुण समान असले तरी, बंगळुरूचा नेट रन रेट माइन्समध्ये आहे. त्यामुळे हे चार संघ प्ले ऑफसाठी पात्र होऊ शकतात.

वाचा-KKRच्या 'या' मॅन विनिंग खेळाडूची गोलंदाजी शैली ठरली आक्षेपार्ह; होणार बॅन?

वाचा-IPL 2020 : पॉईंट्स टेबलमध्ये तळाला असलेल्या टीमचे खेळाडू ऑरेंज कॅप रेसमध्ये

दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादनं 6 पैकी 3 सामने जिंकत 6 गुण मिळवले आहेत. त्यामुळे त्यांना प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागतील. तर, गुणतालिकेत पंजाबचा संघ अंतिम स्थानी आहे. त्यांनी 7 पैकी 6 सामने गमावले आहेत. त्यांच्याकडे केवळ 2 गुण आहेत. त्यामुळे 16 गुण मिळवण्यासाठी त्यांना 14 गुणांची गरज आहे. त्यामुळे आता जवळजवळ पंजाबच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. तर, राजस्थानचा संघ सातव्या स्थानी आहे. राजस्थाननं 6 पैकी 2 सामने जिंकले आहेत. चेन्नईचीही अवस्था अशीच आहे. राजस्थान आणि चेन्नई यांना आता सर्व सामने जास्त फरकाने जिंकावे लागणार आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: October 11, 2020, 10:12 AM IST
Tags:

ताज्या बातम्या