Home /News /sport /

IPL Point Table : धोनी पुन्हा होणार किंगमेकर? 7 सामन्यातील पराभवानंतरही CSKला प्ले ऑफसाठी 'एक' संधी

IPL Point Table : धोनी पुन्हा होणार किंगमेकर? 7 सामन्यातील पराभवानंतरही CSKला प्ले ऑफसाठी 'एक' संधी

गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच चेन्नईचा संघ गुणतालिकेत अंतिम स्थानी आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघानं 10 पैकी 7 सामन्यात पराभव मिळवला आहे.

    अबू धाबी, 20 ऑक्टोबर : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL 2020) आता प्ले ऑफच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली आहे. जस जशी स्पर्धा पुढे जात आहे, तसा तसा रोमांचही वाढत आहे. मात्र सोमवारी चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) राजस्थानकडून 7 विकेटनं पराभव स्विकारावा लागला. यासह चेन्नईला संघ आता गुणतालिकेत अंतिम स्थानी आला आहे. तर, राजस्थान 8 गुणांसह पाचव्या स्थानी पोहचला आहे. गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच चेन्नईचा संघ गुणतालिकेत अंतिम स्थानी आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघानं 10 पैकी 7 सामन्यात पराभव मिळवला आहे. मात्र CSKचा संघ गुणतालिकेत अंतिम स्थानी असला तरी, त्यांना आता एक संधी आहे. CSKचे 4 सामने शिल्लक आहेत, त्यांना या सामन्यात विजय मिळवून इतर संघाच्या खेळीवर निर्भर रहावे लागणार आहे. त्यामुळे CSKला प्ले ऑफ गाठण्यासाठी इतर संघाची गरज लागणार आहे. तर त्यांना उर्वरित 4 सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. वाचा-IPL स्टार खेळाडूंची बहीण शूटिंग दरम्यान झाली जखमी; फोटो शेअर करून सांगितलं... सोमवारी झालेल्या सामन्यात चेन्नईनं पहिल्यांदा फलंदाजी करत केवळ 125 धावा केल्या. राजस्थाननं हे आव्हान 3 विकेट गमावत पार केले. तीनवेळा चॅम्पियन राहिलेल्या CSKला पहिल्यांदाच अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाचा-IPL 2020 : CSK चा मोठा निर्णय : जखमी ब्राव्होच्या बदल्यात नवा खेळाडू घेणार नाही वाचा-IPL 2020 : 'ते सुपरओव्हरचं सोडा, ही मुलगी कोण सांगा!' मिस्ट्री गर्लचं रहस्य उघड दुसरीकडे गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) संघ 14 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर, चारवेळा चॅम्पियन राहिलेले गतविजेता मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीचा बॅंगलोर संघ आहे. RCBनेही एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवले नाही आहे. तर, गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर 10 गुणांसह KKRचा संघ आहे. चेन्नईला हरवत राजस्थानचा संघ पाचव्या क्रमांकावर आला आहे. सहाव्या क्रमांकावर हैदराबादचा संघ आहे. तर, सलग दोन विजय मिळवत किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ सातव्या क्रमांकावर आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या