IPL Point Table : मुंबई इन, चेन्नई आऊट! 12 वर्षात पहिल्यांदाच घडला असा प्रकार, पाहा Point Table

IPL Point Table : मुंबई इन, चेन्नई आऊट! 12 वर्षात पहिल्यांदाच घडला असा प्रकार, पाहा Point Table

2020 मध्ये काय घडेल आणि काय नाही याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. तसाच काहीसा प्रकार आयपीएलमध्येही घडला.

  • Share this:

शारजा, 24 ऑक्टोबर : चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings), म्हणजे प्ले ऑफ (Playoff) गाठणारा संघ असं काहीसं समीकरण गेल्या 12 वर्षात झालं होतं. मात्र 2020 मध्ये काय घडेल आणि काय नाही याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. तसाच काहीसा प्रकार आयपीएलमध्येही घडला. आयपीएलच्या तेराव्या हंगामात (IPL 2020) पहिल्यांदा चेन्नई सुपरकिंग्जचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मुंबई इंडियन्स (mumbai indians) विरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईला 10 विकेटनं पराभव मिळवावा लागला आणि याचबरोबर प्ले ऑफ गाठण्याचं स्वप्न भंगल.

CSKनं या हंगामात 11 सामन्यांपैकी 8 सामने गमावले आहेत, तर 3 सामन्यात विजय मिळवला आहे. CSKचे आता तीन सामने शिल्लक आहे, या सामन्यात विजय मिळवूनही त्यांना प्ले ऑफ गाठणं शक्य होणार नाही. तर, मुंबई इंडियन्सचा संघ पुन्हा अव्वल स्थानी आला आहे. मुंबई, दिल्ली आणि बँगलोर यांच्या खात्यात आता 14 पॉईंट्स असले, तरी मुंबईचा नेट रनरेट या दोन्ही टीमपेक्षा चांगला आहे. त्यामुळे दिल्ली, मुंबई आणि बॅंगलोर हे तिन्ही संघ प्ले ऑफ गाठण्यासाठी सज्ज आहे.

वाचा-IPL 2020 : मुंबईच्या खेळाडूला नव्हती खेळायची आयपीएल, आता ठरतोय मॅच विनर

वाचा-IPL 2020 : मुंबईने चेन्नईला लोळवलं, धोनीचं प्ले-ऑफचं स्वप्न भंगलं

तर, एका जागेसाठी आता 4 संघांमध्ये लढत आहे. कोलकाताचा संघ 10 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. तर, हैदराबाद, पंजाब आणि राजस्थान यांचे 8 गुण आहेत. या चारही संघांना सर्व सामने जिंकावेच लागणार आहेत.

वाचा-IPL 2020 : 'त्या खेळाडूंवरचे 15 कोटी रुपये पाण्यात', क्रिकेटपटूचा धोनीवर निशाणा

दरम्यान, चेन्नईला प्ले ऑफ गाठण्याची एक संधी आहे. 12 गुणांसह चेन्नई प्ले ऑफ गाठू शकते. गेल्या वर्षी हैदराबादनं असेच केले होते. मात्र चेन्नईचा प्रवास सोपा नसेल, त्यांना इतर संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 24, 2020, 9:26 AM IST

ताज्या बातम्या