स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020: 3 जागांसाठी 6 संघांमध्ये करो वा मरोची लढाई, पाहा तुमचा आवडता संघ कसा गाठणार Playoff

IPL 2020: 3 जागांसाठी 6 संघांमध्ये करो वा मरोची लढाई, पाहा तुमचा आवडता संघ कसा गाठणार Playoff

IPL 2020: 4 सामन्यात ठरणार कोणते 3 संघ गाठणार Playoff, पॉइंट टेबलमध्ये या 6 टीममध्ये शर्यत.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL 2002) शनिवारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर (RCB) यांच्या पराभवानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. मुंबई इंडियंस (Mumbai Indians) हा सध्या एकमेव संघ आहे जो प्लेऑफमध्ये (Playoff) पोहचला आहे. मात्र अजूनही प्ले ऑफ गाठणारे उरलेले 3 संघ कोणते असतील हे अद्याप स्पष्ट झाले नाही आहे. सहा संघांमध्ये सध्या तीन जागांसाठी स्पर्धा सुरू आहे. आयपीएल लीग स्टेजमध्ये आता केवळ 4 सामने शिल्लक आहेत. त्यामुळे या 6 संघांमध्ये सध्या करो वा मरोची लढाई आहे.

14 गुण असलेले 2 टीम

रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स 14 गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. शनिवारी दोन्ही संघांनी सामने जिंकले असता, त्यांना प्लेऑफ गाठता आला असता. मात्र दोन्ही संघांना पराभवाचा फटका बसला. मुख्य म्हणजे दिल्ली आणि बॅंगलोर यांचा अखेरचा सामना एकमेकांविरुद्ध असणार आहे. त्यामुळे जो संघ जिंकेल त्याला थेट प्लेऑफमध्ये प्रवेश मिळेल.

वाचा-IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये पोहोचलेल्या मुंबईसाठी ही ठरणार डोकेदुखी?

वाचा-IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

तर, सनराजर्स हैदराबाद, किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्याकडे 12-12 पॉइंट आहेत. हैदराबादचा नेट रन रेट प्लसमध्ये आहेत. सध्या कोलकाता संघाचा रन रेट सगळ्यात खराब आहे. तर, पंजाबला प्ले ऑफ गाठण्यासाठी केवळ एका विजयाची गरज आहे. आज त्यांचा अखेरचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध होणार आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: November 1, 2020, 10:05 AM IST
Tags: IPL 2020

ताज्या बातम्या