IPL 2020मध्ये 'हे' आहेत सर्वात महागडे खेळाडू, एका सामन्यासाठी मिळतात 15 कोटी

IPL 2020मध्ये 'हे' आहेत सर्वात महागडे खेळाडू, एका सामन्यासाठी मिळतात 15 कोटी

असा आहे आयपीएल खेळणाऱ्या टॉप खेळाडूंचा पगार.

  • Share this:

मुंबई, 04 डिसेंबर : इंडियन प्रीमिअर लीग ही जगातली सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. आयपीएलच्या लिलावात दरवर्षी कोट्यावधींची बोली लावली जाते. पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या 13व्या हंगामासाठी तयारीला सुरुवात झाली आहे. यासाठी 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे लिलाव होणार आहे. या लिलावासाठी जगभरातील सर्वच खेळाडू इच्छूक आहेत.

आयपीएलमध्ये दरवर्षी कोट्यावधींची उलाढाल केली जाते. मात्र यंदा रेकॉर्ड ब्रेक खेळाडूंच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. आयपीएलच्या लिलावासाठी 971 खेळाडूंनी निलामीसाठी इच्छा व्यक्त केल आहे. तर, 9 डिसेंबर रोजी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर होणार आहे.

याआधी आयपीएल खेळणाऱ्या आठही संघांनी काही खेळाडूंना रिटेन तर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. तर, काही खेळाडूंची अदला बदलीही करण्यात आली. त्यानंतरही 971 खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छूक आहेत. बीसीसीआयनं याबाबत माहिती देताना लिलावात एकूण 73 जागा भरल्या जाणार आहेत. यात 215 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एकही सामना खेळलेला नाही तर, 754 खेळाडू हे पहिल्यांदा आयपीएल खेळण्यास उत्सुक आहेत.

वाचा-एका दिवसात होणार 971 खेळाडूंचा लिलाव, लागणार कोट्यावधींची बोली

हे आहेत महागडे खेळाडू

आयपीएलममध्ये विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार आहे. मात्र विराटला आतापर्यंत एकदाही विजेतेपद जिंकता आलेले नाही. असे असले तरी आयपीएलमध्ये सर्वात जास्त मानधन मिळवणारा विराट कोहली एकमेव फलंदाज आहे. विराटला आरसीबी संघाकडून 17 कोटी रुपये मिळतात. तर, चार वेळा चॅम्पियन असणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माला 15 कोटी मानधन मिळते. तेवढेच मानधन सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मिळते.

वाचा-लिलावाआधीच संकटांचे ढग! दिग्गज खेळाडू म्हणाला ‘IPLमध्ये आता मजा नाही’

धोनी-रोहितच्या पंगतीत ऋषभ पंत

महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंतलाही धोनी एवढाच पगार मिळतो. पंत हा सध्या आयपीएलमधून दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पंत सर्वात युवा खेळाडू असून सर्वात जास्त विजेतेपद असलेल्या धोनी आणि रोहितला समान पगार आहे.

वाचा-खेळाडूनं सोडला क्रिकेटमधला सर्वात सोपा कॅच, फलंदाजालाही विश्वास बसला नाही

आयपीएलमध्ये सर्वात जास्त मानधन असलेले खेळाडू

1. विराट कोहली (RCB) - 17 कोटी

2. एमएस धोनी (CSK) - 15 कोटी

3. रोहित शर्मा (MI) - 15 कोटी

4. ऋषभ पंत (DC) - 15 कोटी

5. स्टिव्ह स्मिथ (RR) - 12.50 कोटी

6. डेव्हिड वार्नर (SRH)- 12.50 कोटी

7. बेन स्टोक्स (RR) - 12.50 कोटी

8. सुनील नरेन (KKR) - 12.50 कोटी

9. सुरेश रैना (CSK) - 11 कोटी

10. मनीष पांडे (SRH) - 11 कोटी

11. केएल राहुल (KXIP) - 11 कोटी

12. हार्दिक पांड्या (MI) - 11 कोटी

13. एबी डिविलियर्स (RCB) - 11 कोटी

14. राशिद खान (SRH) - 9 कोटी

15. क्रुणाल पांड्या (MI) - 8.80 कोटी

16. भुवनेश्वर कुमार (SRH) - 8.50 कोटी

17. आंद्रे रसेल (KKR) - 8.50 कोटी

18. संजू सॅमसन (RR) - 8 कोटी

19. केदार जाधव (CSK) - 7.80 कोटी

20. आर अश्विन (DC) - 7.60 कोटी

21. दिनेश कार्तिक (KKR) - 7.40 कोटी

22. जोफ्रा आर्चर (RR) - 7.20 कोटी

23. जसप्रीत बुमराह (MI) - 7 कोटी

24. श्रेयस अय्यर (DC) - 7 कोटी

25. रवींद्र जडेजा (CSK) - 7 कोटी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2019 07:41 AM IST

ताज्या बातम्या