IPL 2020 : रोहित शर्मा IPL खेळणार की नाही? अखेर हिटमॅनचा मेडिकल रिपोर्ट आला समोर

IPL 2020 : रोहित शर्मा IPL खेळणार की नाही? अखेर हिटमॅनचा मेडिकल रिपोर्ट आला समोर

रोहित शर्मा आयपीएल खेळणार नसल्याचे दिसत आहे. रोहितचा मेडिकल रिपोर्टही निवड समितीला देण्यात आला आहे.

  • Share this:

दुबई, 28 ऑक्टोबर : भारताचा दिग्गज सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएलदरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. रोहितच्या हॅमस्ट्रिंग झाल्याचे सांगितले जात आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या रोहित शर्मानं दोन सामना खेळले नाही आहेत. एवढेच नाही तर, दुखापतीमुळे बीसीसीआयनं रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातूनही वगळले आहे. भारतीय संघाचा फिजिओ नितिन पटेल यांनी निवड समितीला अशी माहिती दिली की, रोहित शर्मा उपलब्ध नाही आहे. पटेल यांनी रोहित शर्माची मेडिकल रिपोर्टही दिला होती.

याआधी बीसीसीआयनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 संघात रोहित शर्माला वगळण्यात आले. बीसीसीआयच्या निवेदनात रोहित शर्माच्या दुखापतीकडे लक्ष दिले जाणार असल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळी मुंबई इंडियन्सनं रोहित शर्मा सराव करत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला होता, त्यामुळे नक्की रोहित शर्मा दुखापतग्रस्त आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, निवड समितीनं रोहित फिट नसल्याचे सांगितले आहे. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फिट होण्याकरिता रोहित शर्मा आयपीएल सामने खेळणार नाही आहे.

रोहित शर्माला विश्रांतीचा सल्ला

नितिन पटेल यांनी रोहितच्या दुखापतीबाबत दोन विशेष डॉक्टरांशी चर्चा केली आहे. रोहितला दोन-तीन आठवडे आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे रोहित शर्मा आयपीएल खेळणार नसल्याचे दिसत आहे. रोहितचा मेडिकल रिपोर्टही निवड समितीला देण्यात आला आहे. बीसीसीआयचे अधिकार प्रत्येक खेळाडूचा फिटनेस रिपोर्ट पाहूनच त्यांची निवड करते.

रोहित शर्माला काय झालं?

18 ऑक्टोबर रोजी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्मा खेळू शकला नव्हता. 23 ऑक्टोबर रोजी चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहितला हॅमस्ट्रिंग झाल्याचे सांगण्यात आले. सध्या मुंबई इंडियन्सची जबाबदारी पोलार्डकडे आहे.

मुंबईचा संघ अव्वल

सध्या गुणतालिकेत मुंबईचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी 11 सामन्यात 14 गुण मिळवले आहे. त्यामुळे मुंबईचा संघ प्ले ऑफ नक्कीच गाठू शकतो. मात्र संघात रोहित शर्मा नसेल तर फलंदाजी कमकुवत होऊ शकते. सध्या रोहितच्या जागी सौरभ तिवारीला संधी देण्यात आली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 28, 2020, 12:02 PM IST

ताज्या बातम्या