स्पोर्ट्स

  • associate partner

IPL MI vs RCB : विराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी?

IPL MI vs RCB : विराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी?

IPL MI vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) एकमेकांशी दोन हात करणार आहे.

  • Share this:

दुबई, 28 सप्टेंबर : आज आयपीएलच्या (IPL 20200) तेराव्या हंगामात टीम इंडियाचा कर्णधार आणि उप-कर्णधार यांच्या लढत होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) एकमेकांशी दोन हात करणार आहे. दोन्ही संघानी या हंगामात एक सामना गमावला आहे तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. दरम्यान, गेल्या सामन्यात रोहित शर्मानं आक्रमक अर्धशतकी खेळी केली होती, मात्र कर्णधार विराट कोहलीला अद्याप सूर गवसलेला दिसत नाही आहे.

गेल्या दोन सामन्यात विराटनं केवळ 15 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल तर दुसरीकडे विराटला रोखण्यासाठी मुंबई इंडियन्स आपल्या एका हुकुमी एक्क्याला गोलंदाजी देण्यासाठी उत्सुक असतील. मुंबई इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक असला तरी या हंगामातील दोन सामन्यात त्याला गोलंदाजी देण्यात आली नाही.

वाचा-29 षटकार, 34 चौकार अन् 449 धावा! एकाच सामन्यात रचले गेले 5 रेकॉर्ड

पाठीच्या दुखापतीमुळे तब्बल वर्षभर पांड्या क्रिकेट खेळू शकला नव्हता. नोव्हेंबर 2019मध्ये लंडनमध्ये पांड्याची सर्जरी झाली होती. त्यानंतर आता तो आयपीएल खेळत आहे. मात्र मुंबई इंडियन्सचा बॉलिंग कोच जहीर खाननं पांड्या गोलंदाजी करणार की नाही, याबाबत खुलासा केला आहे. जहीरनं सांगितले की, "आम्हालाही अपेक्षा आहे की हार्दिकनं गोलंदाजी करावी. तो असा खेळाडू आहे ज्यामुळे संघात संतुलन राहते". जहीर असेलही म्हणाला की, "हार्दिकला गोलंदाजी देण्याआधी त्याचे फिटनेस पाहावे लागेल. हार्दिकही गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र संयम ठेवावा लागेल. घाई करून चालणार आहे".

वाचा-तीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6! पाहा VIDEO

हार्दिकने कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध दोन सामन्यात 18 आणि 14 धावांची खेळी केली होती. मात्र या दोन्ही सामन्यात हार्दिकला गोलंदाजी दिली नाही. तर दुसरीकडे 2015नंतर पहिल्यांदाच केरन पोलार्डनं गोलंदाजी केली.

वाचा-निकोलस पूरनच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा हा VIDEO मिस केला तर लगेच पाहा

आरसीबीचा संघ: अॅरॉन फिंच, देवदत्त पडिक्कल, पार्थिव पटेल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, गुरकीरत मान, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, वाशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, एडम जम्पा, इसुरू उडाना, मोईन अली, जोश फिलीप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, क्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, मिचेल मॅक्लेघन, मोहसिन खान, नाथन कूल्टर नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटोन डि कॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट.

Published by: Priyanka Gawde
First published: September 28, 2020, 2:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading