Home /News /sport /

पोलार्डची सुपरमॅनगिरी! 2014 आणि 2020 मधले हे VIDEO पाहून तुम्हीच सांगा सर्वात बेस्ट कॅच कोणता?

पोलार्डची सुपरमॅनगिरी! 2014 आणि 2020 मधले हे VIDEO पाहून तुम्हीच सांगा सर्वात बेस्ट कॅच कोणता?

मुंबई इंडियन्सचा स्टार ऑलराउंडर कायरन पोलार्ड (Keiron Pollard) संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. फलंदाजी असो किंवा फिल्डिंग पोलार्ड सर्वोत्तम कामगिरी करतो.

    अबु धाबी, 07 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) या हंगामात मुंबईने विजयाची हॅट्रिक नोंदवली आहे. राजस्थान (Rajasthan Royals) विरुद्धच्या झालेला सामना मुंबईने 57 धावांनी जिंकला. याचबरोबर मुंबईचा संघ पॉईंट्स टेबलवर पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. मुंबईने ठेवलेल्या 194 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला 18.1 ओव्हरमध्ये 136 रनवर ऑलआऊट केले. या सामन्यात मुंबईकडून गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. मात्र सर्वांचे लक्ष वेधले ते कायरन पोलार्डनं (Keiron Pollard). मुंबई इंडियन्सचा स्टार ऑलराउंडर कायरन पोलार्ड (Keiron Pollard) संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. फलंदाजी असो किंवा फिल्डिंग पोलार्ड सर्वोत्तम कामगिरी करतो. राजस्थानविरुद्ध झालेल्या सामन्यातही पोलार्डनं जबरदस्त कॅच घेतला. राजस्थानकडून चांगली फलंदाजी करणाऱ्या जॉस बटलरचा कॅच पोलार्डनं घेतला. मात्र हा कॅच त्यानं हवेत उडी मारत एका हातानं टिपला. हा कॅच पाहून बटरलही हैराण झाला. मुंबईनं दिलेल्या 194 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला चांगली सुरुवात करता आली नाही. बटलरवर संघाची मदार होती. त्यानं 44 चेंडूत 70 धावा केल्या. 14व्या ओव्हरमध्ये बटलरनं मोठा शॉट खेळला, मात्र लॉंग ऑनवर फिल्डिंग करत असलेल्या पोलार्डनं एका हातानं कॅच घेतला, मात्र त्याच्या हातातून कॅट सुटला, मात्र चेंडू जमिनीवर पडण्याआधी पोलार्डनं दुसऱ्या हातानं कॅच घेतला. मात्र पोलार्डनं अशी कामगिरी काही पहिल्यांदा केली नाही आहे. मुंबई इंडियन्ससंघासाठी पोलार्डनं अनेकदा अशा जबरदस्त कॅच घेतल्या आहेत. 2014 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धचा पोलार्डनं अशाच प्रकारचा एक जबरदस्त कॅच घेतला होता. यावेळी हरभजन सिंग गोलंदाजी करत होता. पोलार्डनं घेतलेला कॅच पाहून बटलरही हैराण झाला. दरम्यान राजस्थानविरुद्ध काल घेतलेला कॅच पाहून दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरनं ट्वीट करत, असे जबरदस्त कॅच फक्त कायरन पोलार्डच घेऊ शकतो, असे म्हटले आहे. मात्र चाहत्यांपुढे आता प्रश्न पडला आहे की नेमका पोलार्डचा सर्वोत्तम कॅच कोणता असावा.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Mumbai Indians

    पुढील बातम्या