अबू धाबी, 23 सप्टेंबर : आज आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. कोलकाताचा हा तेराव्या हंगामातील पहिला सामना असेल तर मुंबईनं पहिला सामना गमावला होता. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असेल. चेन्नई विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांना आणि फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे मुंबई एका नव्या चेहऱ्याला आजच्या सामन्यात संधी देऊ शकते.
आतापर्यंत अनेक युवा खेळाडूंनी आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. असाच एक मुंबई इंडियन्समधील जलदगती गोलंदाज मोहसीन खान आपल्या पदार्पणाची वाट पाहत आहे. उत्तर प्रदेशमध्ये विविध श्रेणीतील क्रिकेट गाजविल्यानंतर त्याला आता IPL च्या मैदानावर यंदा खेळण्याची संधी मिळेल, अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा आहे. कधी हाताला दुखापत झाल्याने गोलंदाजी करता येत नाही म्हणून मैदानावर रडणाऱ्या मोहसीननं आपल्या जिद्दीने मुंबई इंडियन्समध्ये स्थान मिळविले आहे.
वाचा-OMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची!
मोहसीनला 2018 मध्ये 20 लाख रुपयांत मुंबई इंडियन्सने विकत घेतले. मात्र आतापर्यंत मैदानावर खेळण्याची संधी त्याला आतापर्यंत मिळालेली नाही. मोहसीन हा एका सामान्य कुटुंबातून आलेला आहे. मुरादाबाद येथील रहिवासी असलेल्या मोहसीनचे वडील पोलीस उपनिरीक्षक आहेत. ज्युनिअर क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्याने लहान वयातच तो सर्वांना माहीत झाला. त्याच्या चांगल्या प्रदर्शनांच्या बळावर त्याची बेंगलोर नॅशनल क्रिकेट अकॅडमी येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली. मात्र प्रशिक्षणा दरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली. यामुळे तो गोलंदाजी करू शकत नव्हता. तो निराश झाला आणि मैदानावरच रडू लागला. नंतर हाताचे ऑपरेशन करण्याचा त्याने निर्णय घेतला व त्यानंतर तो गोलंदाजी करू लागला. त्यानंतर मात्र तो थांबला नाही.
वाचा-गावस्कर यांनी निवडली पलटनची प्लेइंग इलेव्हन! 'या' मुंबईकर खेळाडूला जागा नाही
वाचा-कोरोनामुळे IPL मध्ये होणार मोठा बदल! असे असतील 8 नियम
मोहसीननं अ श्रेणीमधील 11 सामन्यात 19 तर टी-ट्वेटीच्या 20 सामन्यात त्याने 26 विकेट्स घेतल्या. त्याने प्रथम श्रेणीचा एकच सामना खेळला आहे, मात्र 140 च्या गतीने गोलंदाजी करून त्याने फलंदाजांना हैराण केले आहे.
वाचा-IPL 2020 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणार 'विराट'!
शॉर्ट फॉरमॅटचा स्पेशालिस्ट म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. या प्रकारच्या सामन्यांमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट केवळ 7 रन प्रतीओव्हर आहे. यंदाच्या IPL मध्ये मैदान गाजवण्यास तो सज्ज आहे. त्याला संधी मिळेल अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.