स्पोर्ट्स

  • associate partner

MI vs KKR : नाईकांचो झिल आज मुंबईशी भिडणार! रोहितला टक्कर देणार सावंतवाडीचा 'हा' फलंदाज

MI vs KKR : नाईकांचो झिल आज मुंबईशी भिडणार! रोहितला टक्कर देणार सावंतवाडीचा 'हा' फलंदाज

कर्णधार दिनेश कार्तिकनं आपल्या संघात एका कोकणी खेळाडूला संधी दिली आहे. आजच्या सामन्यात कोलकाताकडून खेळणार आहे सिंधुदुर्गातील सावंतवाडीचा निखिल शंकर नाईक.

  • Share this:

अबू धाबी, 23 सप्टेंबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात सामना होत आहे. कोलकाता संघानं या हंगामातील पहिल्याच सामन्यात टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार दिनेश कार्तिकनं आपल्या संघात एका कोकणी खेळाडूला संधी दिली आहे. आजच्या सामन्यात कोलकाताकडून खेळणार आहे सिंधुदुर्गातील सावंतवाडीचा निखिल शंकर नाईक.

निखलनं याआधी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. यंदा तो कोलकाता संघाकडून खेळणार आहे. निखिलला लहानपणापासून क्रिकेटची आवड असल्यामुळे त्यानं टेनिस क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. सावंतवाडी सारख्या ठिकाणी निखिल स्पर्धा गाजवत होत्या. आक्रमक फलंदाजीमुळे त्याची निवड 15 वर्षांखालील संघात झाली.

वाचा-MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सला पहिला झटका, डी कॉक बाद

वाचा-कोहलीला दणका! 10 कोटींना विकत घेतलेला 'हा' खेळाडू IPL मधून घेणार माघार?

क्रिकेटमध्ये आपल्या कारकीर्दीची सुरुवात केल्यानंतरच 2010मध्ये त्याच्या आईचा पक्षघातामुळे निधन झाले. या एका घटनेमुळे निखिल खचून गेला. मात्र त्याला त्याच्या वडिलांनी धीर दिला. 2014मध्ये निखिलची निवड विजय हजारे ट्रॉफीसाठी झाली आणि त्यानं 4 सामन्यात 234 धावा केल्या.

2016 आयपीएलमध्ये निखिलला पंजाब संघाने 20 लाखांच्या बेस प्राइजवर विकत घेतले, मात्र त्याला केवळ दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. 2017-18मध्ये कोणत्याही संघाने निखिलला खरेदी केले नाबी. मात्र 2019मध्ये पर्यायी विकेटकीपर म्हणून निखिलला कोलकाता संघाने घेतेल. आयपीएलआधी निखिलने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत 11 सामन्यात 194 धावा केल्या.

वाचा-धोनी तू चुकलास! राजस्थानविरुद्ध सामन्यात माहीनं घेतलेल्या निर्णयावर भडकला गंभीर

कोलकाता संघात निखिल इंडियन रसेल या नावाने ओळऱला जातो. त्यामुळे आजच्या सामन्यात निखिल मुंबईच्या गोलंदाजांवर भारी पडू शकतो.

कोलकाताचा संघ-सुनील नारायण, शुभमन गिल, नितीश राणा, इयॉन मॉर्गन, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (कर्णधार), निखिल नाईक, पॅट कमिन्स, कुलदीप यादव, संदीप वॉरिअर, शिवम मावी.

Published by: Priyanka Gawde
First published: September 23, 2020, 7:49 PM IST
Tags: IPL 2020

ताज्या बातम्या