Home /News /sport /

MI vs KKR Live Streaming: सामना जिंकण्यासाठी रोहित करणार संघात बदल? येथे पाहा मुंबई विरुद्ध कोलकाता सामना LIVE

MI vs KKR Live Streaming: सामना जिंकण्यासाठी रोहित करणार संघात बदल? येथे पाहा मुंबई विरुद्ध कोलकाता सामना LIVE

एकीकडे पहिला सामना गमावल्यानंतर रोहित शर्मा संघात काही बदल करून कमबॅक करण्याच्या विचारात असेल, तर कोलकाताचा या हंगामातील हा पहिला सामना आहे.

    अबू धाबी, 23 सप्टेंबर : कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात आज लढत होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघातील आक्रमक फलंदाजांकडे विशेष लक्ष असणार आहे. एकीकडे पहिला सामना गमावल्यानंतर रोहित शर्मा संघात काही बदल करून कमबॅक करण्याच्या विचारात असेल, तर कोलकाताचा या हंगामातील हा पहिला सामना आहे. मुंबईने 2013 पासून एकदाही पहिला सामना जिंकला नाही आहे. मात्र आज कोलकाताविरुद्ध त्यांना कडवे आव्हान असेल. कोलकाता संघाकडे सुनील नारायण, आंद्रे रसेल, शुभमन गील यांसारखे विस्फोटक फलंदाज आहेत. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांसमोर त्यानं रोखण्याचे आव्हान असेल. गोलंदाजीमध्ये कोलकाताकडून सुनील नरेन आणि कुलदीप यादव याचबरोबर सगळ्यात महागडा खेळाडू पॅट कमिन्स यांच्यावर मदार असेल. मुंबईकडून आजच्या सामन्यात सौरभ तिवारी ऐवजी इशान किशानला जागा मिळू शकते. कुठे आणि कधी पाहता येणार सामना? कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)यांच्यातील सामना शेख जैयद स्टेडियमवर खेळला जाणार आहे. किती वाजता सुरू होणार सामना ? भारतीय वेळेनुसार सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. याआधी 7 वाजता टॉस होईल. येथे पाहा सामन्याचा LIVE टेलिकास्ट कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (star sports network) वर पाहता येणार आहे. येथे पाहू शकता ऑनलाईन जर तुम्हाला ऑनलाइन सामना पाहायचा असल्याच तुम्ही डिज्नी हॉटस्टार अॅपवर (Disney Hotstar VIP) पाहू शकता. कोलकाता नाइट रायडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार), इयॉन मोर्गन, नीतिश राणा, राहुल त्रिपाठी, रिंकू सिंह, शुभमन गिल, सिद्धेश लाड, अली खान, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्र्युसन, पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वारिअर, शिवम मावी, वरूण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, सुनील नारायण, निखिल नाईक, टॉम बेंटोन. मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पंड्या, इशान किशन, जेम्स पॅटिंसन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, केरन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, मिचेल मॅक्लेघन, मोहसिन खान, नाथन कूल्टर नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: IPL 2020, Mumbai Indians

    पुढील बातम्या