Home /News /sport /

IPL MI vs KKR Live : आला रे आला! मुंबई इंडियन्सने 49 धावांनी एकहाती जिंकला सामना

IPL MI vs KKR Live : आला रे आला! मुंबई इंडियन्सने 49 धावांनी एकहाती जिंकला सामना

मुंबईने दिलेल्या 197 धावांचे आव्हान कोलकाताला पार करता आले नाही. कोलकातानं 20 ओव्हरमध्ये 146 धावा केल्या.

    अबू धाबी, 23 सप्टेंबर : कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईनं एकहाती विजय मिळवला. मुंबईने दिलेल्या 197 धावांचे आव्हान कोलकाताला पार करता आले नाही. कोलकातानं 20 ओव्हरमध्ये 146 धावा केल्या. यासह मुंबईने हा सामना 49 धावांनी जिंकला. मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पॅट कमिन्सनं 11 चेंडूत 33 धावा केल्या. तर दिनेश कार्तिकनं 30 धावा केल्या. याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. मुंबईकडून ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिसन, बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर राहुल चाहर आणि पोलार्डनं प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या. प्रथम फलंदाजी करताना मुंबईकडून रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांना चांगली सुरुवात करता आली नाही. डी कॉक केवळ 1 धावा करत बाद झाला. मात्र त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांनी 90 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार यादव 28 चेंडूत 47 धावा करत धावबाद झाला. अतिरिक्त धाव घेण्याच्या नादात सुनील नारायणनं सूर्यकुमारला बाद केले. त्यानंतर सौरभ तिवारी आणि रोहित शर्मा यांनी चांगली भागीदारी केली. मात्र सौरभ तिवारीही 21 धावा करत बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मालाही शिवम मावीनं कमिन्सच्या हाती कॅच देत बाद केले. हार्दिक पांड्या 18 धावांवर हिट विकेट झाला. कोलकाताकडून शिवम मावीनं दोन, तर सुनील नारायण आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या. कोलकाता नाइट रायडर्स : सुनील नारायण, शुभमन गिल, नितीश राणा, इयॉन मॉर्गन, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (कर्णधार), निखिल नाईक, पॅट कमिन्स, कुलदीप यादव, संदीप वॉरिअर, शिवम मावी. मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पांड्या, केरन पोलार्ड, कृणाल पांड्या, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: IPL 2020, Mumbai Indians

    पुढील बातम्या