Home /News /sport /

MI vs KKR : पांड्याचा इंजमाम अवतार! अशी अजब विकेट तुम्ही कधीच पाहिली नसेल, पाहा VIDEO

MI vs KKR : पांड्याचा इंजमाम अवतार! अशी अजब विकेट तुम्ही कधीच पाहिली नसेल, पाहा VIDEO

ना गोलंदाजानं बाद केलं ना फिल्डरने तरी आऊट झाला पांड्या. पाहा नेमकं काय घडलं

    अबू धाबी, 24 सप्टेंबर : मुंबई इंडियन्सचा आक्रमक खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) तुफानी खेळीसाठी ओळखला जातो. मात्र कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात एक विचित्र प्रकार घडला. हार्दिक पांड्या ज्याप्रकारे बाद झाला, ते पाहुन केवळ चाहत्यांनाच नाही तर खुद्द हार्दिकलाच विश्वास बसला नाही. प्रथम फलंदाजी करताना आंद्रे रसेलच्या चेंडूवर न खेळताच बाद झाला. तर, या सामन्यात हार्दिक पांड्याला गोलंदाजानं किंवा खेळाडूनं नाही तर त्याच्या बॅटनं बाद केला. हार्दिक पांड्या कोलकाताविरुद्ध झालेल्या सामन्यात पांड्या हिट विकेट बाद झाला. आंद्रे रसेलने टाकलेला चेंडू हार्दिक पांड्याच्या जवळून दिनेश कार्तिकच्या हातात गेला. मात्र अचानक पंचांनी पांड्याला बाद घोषित केल्यानंतर त्यानंतर पांड्या हिट विकेट झाल्याचे कळले. रसेलच्या चेंडूवर कट मारण्याच्या नादात पांड्याची बॅट स्टम्पला लागली. हिट विकेट बाद झाल्याचे कळताच हार्दिक पांड्याही हसत मैदानाबाहेर गेला. वाचा-MI vs KKR : रोहित शर्माचं अनोखं 'द्विशतक', नावावर केला आणखी एक विक्रम! वाचा-कोहलीला दणका! 10 कोटींना विकत घेतलेला 'हा' खेळाडू IPL मधून घेणार माघार? आयपीएलमध्ये हे फलंदाज झाले आहेत हिट विकेट मुसाविर खोटे (मुंबई इंडियन्स 2008) मिसबाह-उल-हक (RCB 2008) स्वप्निल असनोडकर (राजस्थान 2009) रवींद्र जडेजा (चेन्नई 2012) सौरभ तिवारी (RCB 2012) डेव्हिड वॉर्नर (हैदराबाद 2016) दीपक हुड्डा (हैदराबाद 2016) युवराज सिंग (हैदराबाद 2016) शेल्डन जॅकसन (कोलकाता 2017) रियान पराग (राजस्थान 2019) हार्दिक पांड्या (मुंबई 2020)
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Hardik pandya, IPL 2020

    पुढील बातम्या