स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020: MI vs CSK Preview: चेन्नई सुपरकिंग्ज आज मुंबई इंडियन्सला हरवणारच! धोनीकडे आहे खास प्लॅन

IPL 2020: MI vs CSK Preview: चेन्नई सुपरकिंग्ज आज मुंबई इंडियन्सला हरवणारच! धोनीकडे आहे खास प्लॅन

गेल्या वर्षी मुंबईने अखेरच्या षटकात चेन्नईला हरवून त्यांच्या तोंडचा घास पळवला होता. हा बदला घेण्यासाठी चेन्नई मैदानात उतरेल.

  • Share this:

अबू धाबी, 19 सप्टेंबर : गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आला आहे. आजपासून आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाला सुरुवात होईल. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स (mumbai indians) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (chennai superkings) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ विजयाचे प्रबळ दावेदार आहे. मुंबईने रोहितच्या नेतृत्वाखाली चार वेळा आयपीएलचा किताब मिळवला आहे. तर, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं 3 वेळा आपल्या संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे.

गेल्या वर्षी मुंबईने अखेरच्या षटकात चेन्नईला हरवून त्यांच्या तोंडचा घास पळवला होता. हा बदला घेण्यासाठी चेन्नई मैदानात उतरेल. मात्र दोन्ही संघातील काही मुख्य खेळाडू यावर्षी खेळताना दिसणार नाहीत. मुंबईचा मॅच विनर गोलंदाज लसिथ मलिंगा तर चेन्नईचा आक्रमक फलंदाज सुरेश रैना आणि गोलंदाज हरभजन सिंग यावेळी खेळताना दिसणार नाही आहेत. मात्र तरी धोनीनं मुंबईला हरवण्यासाठी एक खास प्लॅन रचला आहे.

वाचा-लय भारी पलटन! सामन्याआधीच मुंबई इंडियन्सनं CSKला हरवलं, नावावर केला 'हा' विक्रम

चेन्नईसमोर नाही टिकू शकणार मुंबई?

चेन्नई आणि मुंबई यांच्यातील टक्कर नेहमीच चाहत्यांसाठी रोमांचक असते. मात्र युएइमध्ये मुंबई इंडियन्सचे रेकॉर्ड चांगले नाही आहेत. चेन्नई आणि मुंबई यांच्यात अबुधाबीमध्ये सामना खेळला जाणार आहे. या मैदानावर फलंदाजांना धावा काढणं कठिण असेल. शेख जायद स्टेडियमवर आजचा सामना होणार आहे, या मैदानाचे पिच चेन्नईच्या चेपॉकसारखे आहे. हे मैदान धिम्या आणि स्पिनर गोलंदाजांसाठी फायद्यासाठी आहे.

धोनीकडे आहेत दर्जेदार स्पिनर्स

अबू धाबीचे पिच पाहता मुंबईच्या तुलनेत चेन्नईकडे जास्त चांगले स्पिनर्स आहेत. धोनीकडे रविंद्र जडेजा, मिचेल सॅटनर, इमरान ताहिर, पियूष चावला असे फिरकी गोलंदाज आहेत. धोनी पहिल्या सामन्यात इमरान ताहिर, पियूष चावला आणि रविंद्र जडेजा यांना संधी देऊ शकतो. तर, मुंबई इंडियन्सकडे एकही अनुभवी फिरकी गोलंदाज नाही आहे. मुंबईकडे राहुल चाहर आणि क्रुणाल पांड्या असे दोनच फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे फिरकी गोलंदाजीत चेन्नईचा संघ मुंबईपेक्षा वरचढ आहे.

वाचा-कधी, कुठे आणि कसा पाहता येणार मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपरकिंग्ज सामना LIVE

मुंबईची फलंदाजी मजबूत

जर चेन्नईची गोलंदाजी मजबूत असेल तर मुंबईची फलंदाजी दर्जेदार आहे. मुंबईत रोहित शर्मा, क्विंटन डीकॉक, सूर्यकुमार यादव, केरन पोलार्ड, हार्दिक पांड्या सारखे एका पेक्षा एक फलंदाज आहेत. तर, धोनीकडे वॉटसन, रायडू आणि डुप्लेसीस सारखे आक्रमक फलंदाज आहेत.

आकड्यांमध्ये मुंबई चेन्नईवर भारी

मुंबई इंडियन्सचा संघ कायमच चेन्नईवर भारी पडला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 30 सामने झाले आहेत. त्यापैकी 18 सामने मुंबईने तर 12 चेन्नईने जिंकले आहेत. मात्र गेल्या 7 वर्षात मुंबई इंडियन्सला एकदाही आपला पहिला सामना जिंकण्यात यश आले नाही आहे. मात्र मुंबईने 10 पैकी 8 अंतिम सामन्यात चेन्नईला हरवले आहे.

वाचा-फिर से माही मारेगा! तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी

मुंबईचा संभाव्य संघ: 1. रोहित शर्मा (कर्णधार), 2. क्विंटन डीकॉक (विकेटकीपर), 3. सूर्यकुमार यादव, 4. ईशान किशन, 5. केरन पोलार्ड, 6. हार्दिक पांड्या, 7. क्रुणाल पांड्या, 8. नाथन कूल्टर-नाइल, 9. राहुल चाहर, 10. ट्रेंट बोल्ट, 11. जसप्रीत बुमराह.

चेन्नईचा संभाव्य संघ: शेन वॉटसन, 2. अंबाति रायडू, 3. फाफ डुप्लेसी, 4. एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), 5. केदार जाधव, 6. रविंद्र जडेजा, 7. पियूष चावला, 8. दीपक चाहर, 9. शार्दुल ठाकूर, 10. इमरान ताहिर, 11. ड्वेन ब्राव्हो.

Published by: Priyanka Gawde
First published: September 19, 2020, 5:26 PM IST

ताज्या बातम्या