• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • MI vs CSK LIVE: बदला घेतला! मुंबई इंडियन्सला नमवत CSKने 5 विकेटनं जिंकला सामना

MI vs CSK LIVE: बदला घेतला! मुंबई इंडियन्सला नमवत CSKने 5 विकेटनं जिंकला सामना

चेन्नईने मुंबईला 5 विकेटनं नमवत गेल्या वर्षी आयपीएल फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला.

 • Share this:
  अबू धाबी, 19 सप्टेंबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामातील पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्जने जिंकत या हंगामात विजयी शुभारंभ केला. चेन्नईने मुंबईला 5 विकेटनं नमवत गेल्या वर्षी आयपीएल फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला. मुंबईने दिलेल्या 163 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना अंबाती रायडूनं 48 चेंडूत 71 धावा केल्या. अंबाती रायडूच्या या खेळीच्या जोरावर चेन्नईनं हा सामना जिंकला. अंबाती रायडूला फाफ ड्यू प्लेसिसनं चांगली साथ दिली. फाफनं 42 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पहिल्या दोन ओव्हरमध्येच दोन विकेट गमावल्यानंतर अंबाती आणि फाफनं शतकी भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर चेन्नईनं हा सामना जिंकला. मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका बसला. ट्रेंट बोल्टने शेन वॉट्सनला 4 धावांवर बाद केले, यासह पहिल्याच ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सला यश मिळाले. मात्र त्यानंतर मुंबईने अनेक कॅच आणि मिसफिल्डही केल्या. याचा फायदा चेन्नईला झाला. दरम्यान पहिल्या डावात, मुंबईकडून सौरभ तिवारी (42) वगळता एकाही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. चेन्नईकडून लूंगी नग्धीनं तीन विकेट घेतल्या. तर राहुल चाहर आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. मुंबईकडून रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरुवात केली. मात्र चौथ्या ओव्हरमध्ये पियूष चावलानं ही जोडी फोडली. सामन्याच्या सुरुवातीलाच 48 धावांवर मुंबईचे दोन्ही सलामीवीर बाद झाले होते. रोहित बाद झाल्यानंतर लगेचच मुंबई इंडियन्सला दुसरा झटका बसला. पाचव्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर क्विंटन डी कॉक बाद झाला. सॅम कुरननं क्विंटन डी कॉकला बाद केले. क्विंटननं 5 चौकार मारत 20 चेंडूत 33 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादव आणि सौरभ तिवारीनं चांगली सुरुवात केली. मात्र सूर्यकुमार यादव 17 धावांवर बाद झाला. राहुल चाहरनं सूर्यकुमार यादवला बाद केले. हार्दिक पांड्यानं सामन्याची आक्रमक सुरुवात केली. मैदानात येताच त्यानं षटकार मारला, मात्र रविंद्र जडेजाच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या नादात पांड्या बाद झाला. फाफनं सीमारेषेवर एका हातानं हार्दिकचा कॅच घेत, सौरभ तिवारी आणि हार्दिक पांड्या चांगली फलंदाजी करणार असे वाटत असतानाच फाफनं जबरदस्त कॅच घेत दोघांना माघारी धाडले. केरन पोलार्डही जास्त चांगली फलंदाजी करू शकला नाही. मुंबईचा संघ: रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, केरन पोलार्ड, जेम्स पॅटिसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह. चेन्नईचा संघ: मुरली विजय, शेन वॉट्सन, फाफ ड्यू प्लेसिस, अंबाति रायडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, रविंद्र जडेजा, सॅम कुरन, दीपक चाहर, पियुष चावला, लुंगी नग्धी.
  Published by:Priyanka Gawde
  First published: