स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020: धोनीला हरवण्यासाठी रोहितचा खास प्लॅन, त्याच्या चाहत्यालाच दिली संघात जागा

IPL 2020: धोनीला हरवण्यासाठी रोहितचा खास प्लॅन, त्याच्या चाहत्यालाच दिली संघात जागा

रोहित शर्मानं संघात ईशान किशानच्या जागी धोनीच्या सर्वात मोठ्या चाहत्याला संघात जागा दिली आहे. रोहितनं प्लेइंग इलेव्हनमध्ये सौरभ तिवारीला संघात घेतलं आहे.

  • Share this:

अबू धाबी, 19 सप्टेंबर : मार्चपासून आयपीएल होणार की नाही, यावर चर्चा होत असताना अखेर आजपासून आयपीएल (IPL 2020) सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super kings) यांच्यात पहिला सामना होत आहे. या सामन्यात चेन्नईनं टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईकडून ब्राव्हो आजच्या सामन्यात खेळणार नाही आहे. तर, रोहित शर्मानं संघात ईशान किशानच्या जागी धोनीच्या सर्वात मोठ्या चाहत्याला संघात जागा दिली आहे. रोहितनं प्लेइंग इलेव्हनमध्ये सौरभ तिवारीला संघात घेतलं आहे.

30 वर्षीय क्रिकेटर सौरभ तिवारीला मुंबई इंडियन्सने 50 लाख रुपयांना विकत घेतले. सौरभची तुलना टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची केली जाते. कारण दोघंही मिडल ऑर्डरला आक्रमक फलंदाजी करतात. दोघांची फलंदाजी आणि चौकार लगावण्याची स्टाइलही सारखी आहे. करिअरच्या सुरुवातीला सौरभ तिवारीची हेअरस्टाइलही धोनीसारखीच होती. त्यामुळे मुंबई इंडियन्सकडून फलंदाजीसाठी ईशान किशानच्या जागी सौरभ तिवारीला जागा देण्यात आली आहे.

वाचा-MI vs CSK LIVE: चेन्नईने टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय

वाचा-लय भारी पलटन! सामन्याआधीच मुंबई इंडियन्सनं CSKला हरवलं, नावावर केला 'हा' विक्रम

विराटसोबत खेळला आहे आयपीएल

सौरभ तिवारी 2008मध्ये आयपीएलच्या सुरुवातील मुंबई इंडियन्स संघात होता. तीन वर्ष तिवारी मुंबई संघाकडून खेळत होता. त्यानं 2010मध्ये मुंबईकडून फायनलमध्ये महत्त्वाची भुमिका बजावली होती. त्यानं 16 सामन्यात 419 धावा केल्या होत्या. त्यानं तीन अर्धशतक लगावले होते. स्ट्राइक रेटही 135 होता. त्यानंतर 2011मध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं सौरभ तिवारीला विकत घेतले होते. मात्र त्याला जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही.

वाचा-फिर से माही मारेगा! तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी

मुंबईचा संघ-रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, केरन पोलार्ड, जेम्स पॅटिसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

चेन्नईचा संघ- मुरली विजय, शेन वॉट्सन, फाफ ड्यू प्लेसिस, अंबाति रायडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, रविंद्र जडेजा, सॅम कुरन, दीपक चाहर, पियुष चावला, लुंगी नग्धी

Published by: Priyanka Gawde
First published: September 19, 2020, 7:51 PM IST

ताज्या बातम्या