मुंबई, 08 मार्च : इंडियन प्रीमिअर लीगच्या तेराव्या हंगामाला काही दिवसांच्या कालावधी शिल्लक आहे. 29 मार्चपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होईल. या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. दरम्यान याआधीच आयपीएलचा हा हंगाम कोण जिंकणार याबाबत मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने खुलासा केला आहे.
चारवेळा आयपीएल चॅम्पियन झालेला मुंबई इंडियन्सचा संघ यावेळीही विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने चांगली कामगिरी केली आहे. मात्र तेराव्या हंगामात मुंबई जिंकणार की नाही, असा सवाल चाहत्यांना पडला असताना रोहितनं सर्वांना उत्तर दिले आहे. आयपीएलने एक नवीन जाहिरात तयार केली आहे. यामध्ये मुंबई इंडियन्स संघावर मस्करी करण्यात आली आहे. याआधी आयपीएलच्या जाहिरातीत विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर एकदाही आयपीएलचे विजेतेपद न जिंकल्याबद्दल टिप्पणी केली होती. मात्र रोहितनं या जाहिरातीतून टिकाकारांना उत्तर दिले आहे.
I was simply waiting for the clock to strike the right number! Time to go even this #VIVOIPL season, @mipaltan! #KhelBolega https://t.co/gezddNmgH4 pic.twitter.com/nYfdh8vPjf
— Rohit Sharma (@ImRo45) March 5, 2020
मुंबईचा संघ फक्त विषम आकड्यांवर चालते, असे या व्हिडीओमध्ये रोहितला ऐकवले जाते. मात्र रोहितनं या सगळ्यांचे गणित ठिक केले आहे. रोहितनं आयपीएलचा हा हंगाम 13वा असून 13 क्रमांकही विषम असल्याचे सांगत, मुंबई इंडियन्सचं आयपीएल जिंकणार असल्याचे सांगितले.
मुंबई संघाने 2013, 2015, 2017, 2019 अशा चारवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळं यंदा 2020 सम संख्या असल्यामुळं रोहित जिंकणार नाही, असे या जाहिरातीत सांगण्यात आले होते. मात्र रोहितनं सडेतोड उत्तर देत हा आयपीएलचा तेरावा हंगाम असल्याचे सांगत, आम्हीच जिंकणार असा आत्मविश्वास व्यक्त केला. आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या तेराव्या हंगामाचा पहिला सामना 29 मार्चला होणार आहे. तर अंतिम सामना 24 मेला होईल वानखेडे मैदानावर होईल. मुंबई इंडियन्सचे लिलावात ख्रिस लिन या ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूला आपल्या संघात घेतले, त्यामुळं मुंबई पलटनचा संघ आणखी मजबूत झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, IPL 2020, Mumbai Indians