मुंबई, 11 नोव्हेंबर : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात IPL च्या अंतिम सामन्यात दिल्लीला पराभूत करत मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) जेतेपदक पटकावलं आणि आम्हीच आयपीएलचे किंग असल्याचं दाखवून दिलं. अनुभवी खेळाडूंसह युवांचाही भरणा असलेल्या मुंबई इंडियन्सने सुरुवातीपासूनच आपलं वर्चस्व राखलं होतं. रोहित, पोलार्डसह अनेक दिग्गजांचा समावेश असणाऱ्या मुंबईच्या संघाला सतत चॅम्पियन करणारा खरा शिलेदार कोण, हा मुद्दा सतत चर्चिला जात आहे. या प्रश्नाचं मुंबई इंडियन्सनेच उत्तर दिलं आहे.
प्रत्यक्ष मैदानात उतरणारी मुंबईची टीम जशी मजबूत आहे, तशीच मार्गदर्शन करणारी टीमदेखील. सुरुवातीच्या काही सीझन्समध्ये तर मुंबईच्या पॅव्हेलियनमध्ये सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग, जॉन्टी रोड्स यासारखे दिग्गज दिसत. तर गेल्या काही वर्षांपासून श्रीलंकेचे दिग्गज माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धने हे मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहात आहेत. याच महेला जयवर्धने यांना मुंबईने खरा मास्टरमाईंड म्हणून गौरवलं आहे.
'चार सीझन्स...3 जेतेपदं आणि एक मास्टरमाईंड,' असं म्हणत मुंबई इंडियन्सच्या अधिकृत फेसबुक पेजवरून महेला जयवर्धनेचा यांचा फोटो शेअर करण्यात आला आहे.
2017 🏆
2019 🏆
2020 🏆
Four seasons. Three titles. One MasterMInd👌💙
#OneFamily #MumbaiIndians #Believe🖐🏼 #MIChampion5 #CricketTogether Mahela Jayawardena
Posted by Mumbai Indians on Wednesday, 11 November 2020
दरम्यान, आयपीएल-2020च्या(IPL 2020) तेराव्या हंगामाचा किताब मुंबई इंडियन्सने आपल्या नावावर केला आहे. तब्बल पाचव्यांदा मुंबईचा संघ आयपीएल चॅम्पियन झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईनं 5 विकेटनं विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं महत्त्वपूर्ण अशी 68 धावांची खेळी केली.