IPL 2020 : मुंबईची बॅटिंग गडगडली, हैदराबादला विजयासाठी 150 रनची गरज

IPL 2020 : मुंबईची बॅटिंग गडगडली, हैदराबादला विजयासाठी 150 रनची गरज

हैदराबाद (SRH)च्या बॉलिंगसमोर मुंबई (Mumbai Indians)ची बॅटिंग गडगडली आहे. करो या मरोच्या मॅचमध्ये हैदराबादने मुंबईला 149 रनवर रोखलं आहे.

  • Share this:

शारजाह, 3 नोव्हेंबर : हैदराबाद (SRH)च्या बॉलिंगसमोर मुंबई (Mumbai Indians)ची बॅटिंग गडगडली आहे. करो या मरोच्या मॅचमध्ये हैदराबादने मुंबईला 149 रनवर रोखलं आहे. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर हैदराबादच्या बॉलरनी सुरुवातीपासूनच मुंबईला धक्के द्यायला सुरुवात केली. दुखापतीनंतर पुनरागमन करणारा रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. तर क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, आणि इशान किशन यांना चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. डिकॉक 25 रन, सूर्यकुमार 36 रन आणि इशान किशन 33 रनवर आऊट झाले. मुंबईकडून पोलार्डने 25 बॉलमध्ये 41 रनची आक्रमक खेळी केली. हैदराबादकडून संदीप शर्माने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर जेसन होल्डर आणि शाहबाज नदीमला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. राशिद खानला 1 विकेट घेण्यात यश आलं.

या मॅचसाठी मुंबईने बुमराह आणि बोल्ट यांना विश्रांती दिली आहे. तर धवल कुलकर्णी या मोसमातली पहिलीच मॅच खेळत आहे. तर हैदराबादने अभिषेक शर्माच्याऐवजी प्रियम गर्गला संधी दिली आहे.

आयपीएल ग्रुप स्टेजच्या या शेवटच्या मॅचवर हैदराबाद आणि कोलकात्याचं भवितव्य अवलंबून आहे. आजच्या मॅचमध्ये हैदराबादचा विजय झाला, तर ते प्ले-ऑफमध्ये प्रवेश करतील, तर मुंबईचा विजय झाला तर कोलकाता प्ले-ऑफमध्ये पोहोचेल. मुंबई, दिल्ली आणि बँगलोर या टीमनी आधीच प्ले-ऑफमध्ये धडक मारली आहे.

मुंबईची टीम

रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, इशान किशन, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, कृणाल पांड्या, कायरन पोलार्ड, नॅथन कुल्टर-नाईल, जेम्स पॅटिनसन, राहुल चहर, धवल कुलकर्णी

हैदराबादची टीम

डेव्हिड वॉर्नर, ऋद्धीमान सहा, मनिष पांडे, केन विलियमसन, प्रियम गर्ग, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, शाहबाज नदीम, संदीप शर्मा, टी नटराजन

Published by: Shreyas
First published: November 3, 2020, 7:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या