स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 : एमएस धोनीच्या नावावर नवा वर्ल्ड रेकॉर्ड; वापसी करताच पूर्ण केलं 'शतक'

IPL 2020 : एमएस धोनीच्या नावावर नवा वर्ल्ड रेकॉर्ड; वापसी करताच पूर्ण केलं 'शतक'

वर्ल्ड कप 2019 च्या सेमीफायनलनंतर धोनीने आयपीएल 2020 मध्ये वापसी केली, महत्त्वाचे म्हणजे धोनीच्या वापसीसह त्याच्या नावावर एक मोठं रेकॉर्ड नोंदविण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : इंडियन प्रीमियर लीग 2020 (IPL 2020) चा पहिला सामना अनेक अर्थाने विशेष होता. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असतानाही इतकं मोठं टूर्नामेंट सुरू करणं ही नक्कीच मोठी बाब आहे. सोबतच हा सामना धोनीच्या चाहत्यांसाठीही स्पेशल राहिला आहे. त्याचं झालं असं की धोनी 437 दिवसांनंतर क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला. वर्ल्ड कप 2019 च्या सेमीफायनलनंतर धोनीने आयपीएल 2020 मध्ये वापसी केली, महत्त्वाचे म्हणजे धोनीच्या वापसीसह त्याच्या नावावर एक मोठं रेकॉर्ड नोंदविण्यात आलं आहे.

हे ही वाचा-धोनीला हरवण्यासाठी रोहितचा खास प्लॅन, त्याच्या चाहत्यालाच दिली संघात जागा

एमएस धोनीचं शतक

एमएस धोनी (MS Dhoni) च्या वापसीसोबतच त्याने आपलं 'शतक'देखील पूर्ण केलं आहे. धोनीचं हे शतक बॅटमुळे नाही तर विकेटच्या मागे असल्याने झालं. धोनीने आयपीएलमध्ये  100 कॅच पकडण्याचा रेकॉर्ड केला आहे. धोनीने मुंबई इंडियन्सच्या विरोधात दोन कॅच घेतले. या सामन्यापूर्वी धोनीच्या नावावर 98 कॅच होते. सामन्यात सर्वात आधी धोनीने क्रुणाल पंड्यांचा जबरदस्त कॅच घेतला. यानंतर पोलार्डचा कॅच पकडताच त्याने आपल्या 100 आयपीएल कॅच पूर्ण केले. या सामन्यादरम्यान 2 कॅच घेत त्याने टी20 मध्ये 250 आऊट झाले. तो टी20 मध्ये 250 विकेट घेणारा एकमेक विकेटकीपर आहे.

हे ही वाचा-फाफ ड्यू प्लेसिसनं घेतला जबरदस्त कॅच, बघत बसला हार्दिक पांड्या; पाहा VIDEO

पुन्हा दिसला धोनीचा जलवा

आयपीएल 2020 च्या पहिल्या सामन्यात धोनीने पुन्हा एकदा करुन दाखवलं आहे. धोनी जरी 39 वर्षांचे झाले असले आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलवीला म्हटलं असलं तरी त्यांचा फिटनेस आताही एखाद्या तरुण खेळाडूप्रमाणे आहे. धोनीचे खांदे आणि हात पहिल्यापेक्षा अधिक मजबूत असल्याचे दिसले. धोनीने सांगितलं की तो लॉकडाऊनदरम्यान खूप वर्कआउट करीत होता. धोनीने कर्णधार आणि विकेटकीपर म्हणून चांगली कामगिरी बजावली आहे. धोनीने आयपीएलच्या सामन्यादरम्यान अशा फील्डिंग मुव्ह्स केल्या की ज्यामुळे मुंबई आणि रोहित शर्मा, क्विंटन डीकॉक यांचे विकेट गेले.

Published by: Meenal Gangurde
First published: September 20, 2020, 9:32 AM IST

ताज्या बातम्या