चेन्नई, 02 मार्च : वर्ल्ड कपनंतर क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेला भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी आता पुन्हा खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएलच्या 13 व्या हंगामात तो उतरणार आहे. याच्या तयारीसाठी धोनी चेन्नईला पोहोचला आहे. धोनी जवळपास आठ महिन्यांनी मैदानावर दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. एअरपोर्टवरून संघाच्या हॉटेलमध्ये धोनी पोहोचल्याचा व्हिडिओ असून यात चेन्नईचे चाहते धोनीला गराडा घालत असल्याचं दिसतं.
धोनीसोबत सीएसकेचे व्यवस्थापक रसेल राधाकृष्णन हे आहेत. धोनीशिवाय पीयूष चावला आणि कर्ण शर्मासुद्धा चेन्नईत पोहोचले आहेत. चेन्नईने पीयूष चावलाला 6.75 कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. धोनीचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांनी शेअर केला आहे. माही इज बॅक म्हणत चाहत्यांनीही त्याचे स्वागत केलं आहे.
गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड कपनंतर धोनी क्रिकेटपासून दूर आहे. आता तो चेन्नईच्या संघासोबत ट्रेनिंग सुरु करण्याची शक्यता आहे. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर धोनी क्रिकेट खेळताना दिसलाच नाही. दरम्यानच्या काळात त्याच्या निवृत्तीचीही चर्चा केली जात होती.
Every goose shall bump with First Day First Show feels! Just #StartTheWhistles! #HomeSweetDen pic.twitter.com/DpQBIqahZe
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 1, 2020
धोनीच्या करिअरबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही काही संकेत दिले आहेत. त्यांनी म्हटलं की,'धोनीचं करिअर त्याच्या आयपीएलमधील कामगिरीवर अवलंबून आहे. त्यावरच ठरवलं जाईल की धोनी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून विराट बाहेर? रोहित ऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपद