मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

एका विकेटची किंमत 7.75 कोटी तर एक रन 18 लाखांचा! IPL मधील ही आकडेवारी वाचून व्हाल हैराण

एका विकेटची किंमत 7.75 कोटी तर एक रन 18 लाखांचा! IPL मधील ही आकडेवारी वाचून व्हाल हैराण

मॅक्सवेलनं चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध झालेल्या एका सामन्यात 43 चेंडूत 95 धावांची खेळी केली होती. यात 15 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

मॅक्सवेलनं चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध झालेल्या एका सामन्यात 43 चेंडूत 95 धावांची खेळी केली होती. यात 15 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

यंदा आयपीएलमध्ये लिलावात विकत घेतलेले महागडे खेळाडू नाही तर युवा खेळाडूची जास्त चलती पाहायला मिळत आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामात सध्या सर्व संघ प्ले ऑफमध्ये आपली जागा मिळवण्यासाठी सज्ज आहे. मात्र यंदा आयपीएलमध्ये लिलावात विकत घेतलेले महागडे खेळाडू नाही तर युवा खेळाडूची जास्त चलती पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सवर (Pat Cummins) सर्वात जास्त बोली लावण्यात आली. कोलकाता नाइट राइडर्सनं (Kolkata Knight Riders) कमिन्सला 15.50 कोटी रुपयांना विकत घेतले.

पॅट कमिन्सला लावलेल्या या बोलीमुळे त्याच्याकडून अर्थातच संघाला जास्त अपेक्षा होत्या. मात्र आतापर्यंत एकाही सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. कोलकाताचे आतापर्यंत 7 सामने झाले आहेत. यात कमिन्सनं केवळ दोन विकेट घेतल्या आहे. कमिन्सला ज्या किंमतीत विकत घेतलं आहे. त्यानुसार त्यानं घेतलेल्या एका विकेटची किंमत 7.75 कोटी आहे. आयपीएलआधी फॉर्ममध्ये असलेला हा गोलंदाज युएइमध्ये मात्र चांगली कामगिरी करू शकला नाही आहे.

वाचा-IPLमध्ये खेळाडू करत आहेत 'चुकी'चं काम? नाडा करणार क्रिकेटपटूंची डोपिंग टेस्ट

केवळ कमिन्सचं नाही तर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि शेल्डन कॉट्रेल (Sheldon Cottrell) यांच्याकडूनही संघाला चांगल्या अपेक्षा होत्या. दोन्ही खेळाडूंना किंग्ज इलेव्हन पंजाबनं संघात घेतलं आहे. पंजाबने मॅक्सवेलसाठी 10.75 कोटी तर कॉट्रेलसाठी 8.5 कोटी मोजले होते.

वाचा-डिव्हिलिअर्स आणि विराटने शतकी भागीदारीसोबत केला 'हा' विक्रम

मॅक्सवेलनं 7 सामन्यात केल्या 58 धावा

ग्लॅन मॅक्सवेलनं आयपीएलमध्ये 7 सामन्यात केवळ 58 धावा केल्या आहेत. यानुसार मॅक्सवेलच्या एका रनची किंमत 18 लाख 53 हजार रुपये आहे. तर, कॉट्रेलनं 6 सामन्यात 6 विकेट घेतल्या आहेत. कॉट्रेलचा इकोनॉमी रेट 8.80 आहे, राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात राहुल तेवातियानं त्याला एकाच ओव्हरमध्ये 5 षटकार लगावले होते.

वाचा-Mr. 360 ने केली कमाल! असा सिक्सर मारला की शारजामध्ये झालं ट्रॅफिक जाम

10 कोटींच्या मॉरिसनं खेळला केवळ एक सामना

क्रिस मॉरिस, नाथल कुल्टर नाइल हे खेळाडूही जास्त किंमतीला विकले गेले होते. मॉरिसला RCBने 10 कोटींना तर नाइलला मुंबई इंडियन्सनं 8 कोटींना विकत घेतले. मॉरिसनं बॅंगलोरकडून एक सामना खेळला आहे. तर कुल्टर नाइलला मुंबईने प्लेइंग इलेव्हनमध्येही जागा दिली नाही आहे.

First published:

Tags: Cricket