मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : यंदाच्या मोसमात 'मिड इयर ट्रान्सफर', 8 टीमचे हे खेळाडू उपलब्ध

IPL 2020 : यंदाच्या मोसमात 'मिड इयर ट्रान्सफर', 8 टीमचे हे खेळाडू उपलब्ध

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात मिड सिझन ट्रान्सफर (Mid Season Transfer) करता येणार आहे. म्हणजेच मोसमाच्या सुरुवातीला एका टीमकडून खेळलेला खेळाडू नंतर दुसऱ्या टीमकडूनही खेळू शकणार आहे.

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात मिड सिझन ट्रान्सफर (Mid Season Transfer) करता येणार आहे. म्हणजेच मोसमाच्या सुरुवातीला एका टीमकडून खेळलेला खेळाडू नंतर दुसऱ्या टीमकडूनही खेळू शकणार आहे.

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात मिड सिझन ट्रान्सफर (Mid Season Transfer) करता येणार आहे. म्हणजेच मोसमाच्या सुरुवातीला एका टीमकडून खेळलेला खेळाडू नंतर दुसऱ्या टीमकडूनही खेळू शकणार आहे.

  • Published by:  Shreyas

दुबई, 7 ऑक्टोबर : कोरोना व्हायरसच्या संकटामध्ये यंदा उशीरा का होईना, पण आयपीएल (IPL 2020) ला सुरुवात झाली. भारताऐवजी ही स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. स्पर्धेतल्या बहुतेक टीमच्या 5 मॅच खेळून झाल्या आहेत, तर मुंबईने 6 आणि कोलकात्याने 4 मॅच खेळल्या आहेत. यंदाच्या मोसमात टीमसाठी मिड सिझन ट्रान्सफर (Mid Season Transfer) चा नियम सुरू करण्यात आला आहे. म्हणजेच एखाद्या टीमला दुसऱ्या टीममधल्या एखाद्या खेळाडूची गरज असेल, तर त्याला ट्रान्सफर करता येऊ शकतं. या नियमासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. या नियमामुळे सुरुवातीला एखाद्या टीमकडून खेळणारा खेळाडू याच मोसमात दुसऱ्या टीमकडून मैदानात उतरू शकतो. मागच्यावर्षी पर्यंत फक्त अनकॅप खेळाडूंसाठीच हा नियम होता. आता मात्र सगळे खेळाडू मिड इयर ट्रान्सफरसाठी खुले करण्यात आले आहेत.

मिड सिझन ट्रान्सफरचे नियम

1) खेळाडूने मिड सिझन ट्रान्सफरच्या दिवसापर्यंत 2 पेक्षा जास्त मॅच खेळलेल्या नसाव्यात.

2) टीमने प्रत्येकी 7 मॅच खेळल्यावरच खेळाडूंना ट्रान्सफर करता येईल.

हे खेळाडू मिड सिझन ट्रान्सफरसाठी उपलब्ध (7 ऑक्टोबरला)

चेन्नई सुपरकिंग्ज

केएम आसिफ, इम्रान ताहीर, नारायण जगदिसन, कर्ण शर्मा, मिचेल सॅन्टनर, मोनू कुमार, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, आर साई किशोर, जॉस हेजलवूड

दिल्ली कॅपिटल्स

अजिंक्य रहाणे, आवेश खान, हर्षल पटेल, इशांत शर्मा, किमो पॉल, संदीप लमिचाने, एलेक्स कॅरे, ललित यादव, डॅनियल सॅम्स, तुषार देशपांडे, मोहित शर्मा

किंग्ज इलेव्हान पंजाब

अर्शदीप सिंग, दर्शन नलखांडे, कृष्णप्पा गौतम, हार्डस विलजोईन, क्रिस गेल, हरप्रीत ब्रार, जगदिशा सुचित, मनदीप सिंग, मुजीब उर रहमान, मुरुगन अश्विन, दीपक हुडा, इशान पोरेल, क्रिस जॉर्डन, सिमरन सिंग, तेजिंदर सिंग

कोलकाता नाईट रायडर्स

प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर, सिद्धेश लाड, क्रिस ग्रिन, एम सिद्धार्थ, टॉम बॅन्टन, निखील नाईक, अली खान

मुंबई इंडियन्स

आदित्य तरे, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, जयंत यादव, शरफेन रदरफोर्ड, मिचेल मॅकलॅनघन, क्रिस लिन, नॅथन कुल्टर नाईल, सौरभ तिवारी, मोहसीन खान, दिग्विजय देशमुख, प्रिन्स बलवंत राय

राजस्थान रॉयल्स

मयंक मार्कंडे, अंकित राजपूत, मनन व्होरा, महिपाल लोमरोर, शशांक सिंग, वरुण ऍरोन, कार्तिक त्यागी, ओशेन थॉमस, अनिरुद्ध जोशी, एन्ड्रू टाय, आकाश सिंग, अुनज रावत, यशस्वी जयस्वाल

रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर

गुरुकिरत मान, मोईन अली, मोहम्मद सिराज, पार्थिव पटेल, पवन नेगी, उमेश यादव, जॉस फिलिप, क्रिस मॉरिस, डेल स्टेन, शाहबाज अहमद, पवन देशपांडे, ऍडम झम्पा

सनरायजर्स हैदराबाद

बसील थंपी, बिली स्टॅनलेक, मोहम्मद नबी, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवस्त गोस्वामी, सिद्धार्थ कौल, ऋद्धीमान सहा, विजय शंकर, विराट सिंग, बावनाका संदीप, फॅबियन ऍलन, संजय यादव

First published: