अबु धाबी, 26 ऑक्टोबर : राजस्थान रॉयल्सनं गतविजेत्या मुंबईचा पराभव करत त्यांचे आयपीएलमधील आव्हान कायम ठेवले आहे. बेन स्टोक्सच्या (Ben Stokes)शतकी खेळीच्या जोरावर राजस्थाननं (Rajasthan Royals) मुंबईचा (Mumbai Indians) 8 विकेटने पराभव केला आहे. बेन स्टोक्सनं या सामन्यात 107 धावांची तुफानी खेळी केली. मुंबईनं दिलेल्या 196 धावांच्या बलाढ्या आव्हानाचा पाठलाग करताना सॅमसन आणि स्टोक्स यांनी 152 धावांची भागीदारी केली.
या सामन्यात फॉर्ममध्ये नसलेल्या स्टोक्सनं शानदार शतकी खेळी केली. मात्र या स्टोक्सचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमध्ये स्टोक्स ड्रेसिंग रुमच्या दिशेनं मधलं बोट दुमडत असल्याचे दिसत आहे. स्टोक्सचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर अनेकांनी टीका केली, मात्र हे करण्यामागचं कारण खासं आहे.
वाचा-विराटला सगळ्यात मोठा झटका, बाहेर होऊ शकतो सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज
Top effort from @benstokes38 107* and Samson 54* as they steer @rajasthanroyals to an 8-wicket win against #MI.#Dream11IPL pic.twitter.com/IuHBbTgEDa
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020
वाचा-'...तर सनरायजर्स हैदराबाद अजूनही प्लेऑफ गाठू शकतो', वॉर्नरनं सांगितला प्लॅन
स्टोक्सच्या या सेलिब्रेशनमागे एक प्रेरणादायी कहाणी आहे. मधलं बोट दुमडून सेलिब्रेशन करण्याच्या स्टोक्सच्या स्टाईलमागे त्याचे वडिल जेड स्टोक्स आहे. जेड स्टोक्स मुळचे न्यूझीलंडचे होते, मात्र रग्बी प्रशिक्षक असल्यामुळे ते बेनसह इंग्लंडला आले. जेड स्टोक्स यांना रग्बी खेळत असताना आपल्या मधल्या बोटाला दुखापत झाल्याचे जाणवले.
Saw it again today. Respect! https://t.co/oEXVm3jnPK pic.twitter.com/QZgJFXPe6n
— Kartik Jayaraman (@elitecynic) October 25, 2020
रग्बीपटू म्हणून जेड स्टोक्स यांच्या मधल्या बोटाला झालेल्या दुखापत त्रासदायक होती. अखेरी त्यांना मधल्या बोटाची शस्त्रक्रीया करावी लागेल असा सल्ला डॉक्टरांनी दिला. ज्यासाठी त्यांना काही दिवस खेळापासून दूर रहावं लागणार होतं.
वाचा-हा तर पोलार्डचा भाऊ! आर्चरनं घेतला जबरदस्त कॅच, मैदानावरील सर्व खेळाडू शॉक
रग्बीवर मनापासून प्रेम करणाऱ्या जेड स्टोक्स यांनी शस्त्रक्रीया करण्यास नकार दिला. मात्र खेळत राहता यावं यासाठी जेड स्टोक्स यांनी चक्क डॉक्टरांना आपलं मधलं बोट कापण्याची परवानगी दिली. त्यामुळे प्रत्येक सामन्यात विजयी किंवा शतकी खेळी केल्यानंतर स्टोक्स आपल्या वडिलांची आठवण काढतो.
राजस्थानसाठी सर्व सामने करो वा मरो
मुंबईविरुद्धच्या या विजयासोबतच राजस्थानची टीम पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे. राजस्थानने 12 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तर मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम आहे. मुंबईने 11 पैकी 7 मॅचमध्ये विजय मिळवला असून 4 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.