Home /News /sport /

...तर मुंबईनेच जिंकला असता सामना! युवराज सिंगने सांगितले कुठे चुकला रोहित

...तर मुंबईनेच जिंकला असता सामना! युवराज सिंगने सांगितले कुठे चुकला रोहित

सुपर ओव्हरमध्ये मुंबईने दिलेल्या 8 धावांचा पाठलाग करताना आऱसीबीच्या कॅप्टन कोहलीने चौकार खेचत संघाला विजय मिळवून दिला.

    दुबई, 29 सप्टेंबर : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Chalengers Banglore) यांच्यात सोमवारी झालेल्या सामन्यात ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. सुपर ओव्हरमध्ये विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील आरसीबीने निसटता विजय मिळवत मुंबईला धूळ चारली. सुपर ओव्हरमध्ये मुंबईने दिलेल्या 8 धावांचा पाठलाग करताना आऱसीबीच्या कॅप्टन कोहलीने चौकार खेचत संघाला विजय मिळवून दिला. मात्र सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्मानं घेतलेल्या एका निर्णयामुळे सर्वच चाहते आश्चर्य व्यक्त करत आहे. सुपरओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना रोहितनं पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांना मैदानावर पाठवले. दरम्यान, 20 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर इशान किशन 99 धावा करत बाद झाला होता. त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये इशान किशानला पाठवले जाईल असे वाटत होते. मात्र पोलार्ड आणि हार्दिक यांनी 9 चेंडूत 7 धावा केल्या. तर, बंगळुरूकडून विराट आणि एबी मैदानात उतरत त्यांनी हे आव्हान पार केले. वाचा-IPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव या सामन्यात इशान किशननं 58 चेंडूत 99 धावांची खेळी करत संघाला सुपर ओव्हरपर्यंत पोहचवले. मात्र सुपर ओव्हरपर्यंत रोहितनं इशानला पाठवले नाही, त्यावरून आता भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगनेही नाराजी व्यक्त केली आहे. युवीनं ट्विट करत, “मला वाटतं केरन पोलार्ड आणि इशान किशनने सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करायला हवी होती. ते दोघे सेट झाले होते. मला वाटतं इथेच आरसीबीला संधी मिळाली. आरसीबीकडे मिस्टर 360 ए. बी. डिव्हिलियर्स आहे,”, मुंबईनं सामना कुठे गमावला, हे थोडक्यात सांगितले. वाचा-'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा वाचा-फलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार! वाचा काय आहे कारण '...म्हणून इशानला पाठवले नाही' इशानला सुपर ओव्हरमध्ये का पाठवण्यात आलं नाही या मागील कारण मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतर सांगितले. “इशान पूर्ण थकला होता, त्याच्यात जराही त्राण उरला नव्हता. सुपरओव्हर खेळण्यासाठी तो सज्ज नव्हता. त्याला अजिबात फ्रेश वाटत नव्हतं म्हणून आम्ही हार्दिकला पाठवण्याचा निर्णय घेतला. सुपरओव्हरमध्ये 7 धावा केल्यानंतर तुम्हाला नशिबाची साथ लागतेच. मात्र एबीने मारलेला त्या चौकारामुळे आम्ही सामना गमावला”, असं रोहित म्हणाला.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: IPL 2020

    पुढील बातम्या