IPL 2020 : थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी,

IPL 2020 : थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी,

  • Share this:

दुबई, 28 सप्टेंबर : मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू (RCB) या सामन्याचा थरार सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला. सुपर ओव्हरमध्ये विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील आरसीबीने निसटता विजय मिळवत मुंबईला धूळ चारली. सुपर ओव्हरमध्ये मुंबईने दिलेल्या 8 धावांचा पाठलाग करताना आऱसीबीच्या कॅप्टन कोहलीने चौकार खेचत संघाला विजय मिळवून दिला.

मुंबई विरुद्ध बंगळुरू हा सामना प्रेक्षकांसाठी श्वास रोखून ठेवायला लावणारा ठरला. कारण मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर मैदानात उतरलेल्या रॉयल चॅलेंजर बंगळुरूने (RCB) 20 षटकांत 3 बाद 201 धावा फटकावल्या. बंगळुरूने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईनेही 201 धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला. मात्र त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये आरसीबीने मुंबईवर मात केली.

यामध्ये आरसीबीकडून सलामीवीर देवदत्त पडिक्कलने 54, अॅरॉन फिंच 52 आणि एबी डिलिव्हर्सने याने 55 धावांची वादळी खेळी केली. तर दुसरीकडे मुंबईकडून इशान किशनने 99 धावा फटकावत सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका पार पाडली. पोलार्डने अवघ्या 24 चेंडूत 60 धावा करत सामन्यात रंगत आणली.

Published by: Akshay Shitole
First published: September 28, 2020, 11:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या