स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 : एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्सर; 15.5 कोटींच्या फलंदाजाची पैसा वसूल खेळी

IPL 2020 : एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्सर; 15.5 कोटींच्या फलंदाजाची पैसा वसूल खेळी

MI Vs KKR सामन्यात या फलंदाजाने चौफेर फटकेबाजी करत प्रेक्षकांना खूश केलं. जसप्रीत बुमराहच्या एकाच षटकात त्याने 27 धावा कुटल्या. बुमराहच्या करिअरमधली ही सर्वात महागडी ओव्हर ठरली.

  • Share this:

अबूधाबी, 24 सप्टेंबर : संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE  मध्ये सुरू असलेल्या IPL 2020 क्रिकेट स्पर्धेमध्ये बुधवारी झालेला MI Vs KKR सामना तुम्ही पाहिला असेल. या  सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 49 धावांनी पराभव केला.  पण तरीही चर्चा झाली ती बुमराहच्या एका ओव्हरची. मुंबई या सामन्यात जिंकली असली तरी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (jasprit-bumrah) आणि मुंबई इंडियन्सला सर्वात महागडी ठरली ही एक ओव्हर आणि त्यामागे होता 15.5 कोटींची बोली लागलेला हा फलंदाज.

पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव झाल्यानंतर मुंबईने काल पलटवार करत कोलकाताच्या जबरदस्त पराभव केला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या शानदार खेळीच्या जोरावर 195 धावांचा मजबूत डोंगर उभा केला. यामध्ये रोहित शर्माने जोरदार 80 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाताच्या संघाला 20 षटकांत केवळ 9 बाद 146 धावाच करता आल्या. मात्र या सामन्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मारलेले चार षटकार. या षटकारांची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

बुमराहने या सामन्यात आंद्रे रसेल आणि इऑन मॉर्गन यांची विकेट घेतली पण त्याला पॅट कमिन्सने शेवटच्या षटकात मारलेले चार षटकार महागात पडले.  या सामन्यात बुमराहने अतिशय सुंदर गोलंदाजी करत कोलकात्याच्या फलंदाजांना रोखून ठेवलं होतं. मात्र कोलकात्याने 15 कोटी 50 लाख मोजून विकत घेतलेल्या पॅट कमिन्सने (Pat cummins) त्याला सलग चार षटकार मारले. गोलंदाजीमध्ये फ्लॉप गेल्यानंतर पॅट कमिन्सने फलंदाजीत आपला जलवा दाखवत आपण कमी नसल्याचं दाखवून दिलं.

या सामन्यात पॅट कमिन्सनी 3 षटकांत 49 धावा दिल्यामुळं कोलकाता संघाच्या व्यवस्थापनने केलेल्या खेळाडूंच्या निवडीबाबत  प्रश्न उपस्थित होत होते. या सामन्यात कोलकात्याला शेवटच्या तीन षटकांत 84 धावांची गरज होती. यावेळी रोहित शर्माने बुमराहला गोलंदाजी दिली. नेहमी शेवटची षटकं उत्तम पद्धतीने टाकणाऱ्या बुमराहच्या गोलंदाजीच्या कमिन्सने पार चिंध्या केल्या आणि या षटकात चार षटकार ठोकले. कमिन्सने या सामन्यात 12 चेंडूंत 33 धावांची धमाकेदार खेळी केली.

सुरुवातीच्या तीन षटकांत केवळ 5 धावा देणाऱ्या बुमराहच्या या षटकात कमिन्सने 27 धावा केल्या. त्यामुळे आजपर्यंतच्या बुमराहच्या कारकिर्दीतील हे सर्वात महागडं षटक ठरलं. त्यामुळे या सामन्यात त्याने 4 षटकात 32 धावा देत 2 गडी बाद केले.

4 षटकारांची आतषबाजी

18 व्या षटकात गोलंदाजीला सुरुवात झाल्यानंतर कमिन्सने पहिल्याच चेंडूवर जोरदार षटकार मारला. त्यानंतर दुसरा चेंडू डॉट गेला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर पॅटने लॉन्ग लेगवरून पुन्हा एका जोरदार षटकार मारला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर दोन धावा काढल्या. पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा जोरदार षटकार खेचत षटकातील तिसरा षटकार मारला. त्यानंतर शेवटचा चेंडू वाईड पडला. त्यामुळे तो चेंडू पुन्हा टाकताना बुमराहने दिलेल्या फुलटॉस चेंडूवर जोरदार षटकार मारत कमिन्सने 27 धावा वसूल केल्या.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 24, 2020, 3:17 PM IST
Tags: IPL 2020

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading