MI vs CSK : लाजीरवाण्या पराभवानंतर धोनी घेणार IPL मधून संन्यास? 'या' फोटोमुळे चाहते संभ्रमात

MI vs CSK : लाजीरवाण्या पराभवानंतर धोनी घेणार IPL मधून संन्यास? 'या' फोटोमुळे चाहते संभ्रमात

CSKनं या हंगामात 11 सामन्यांपैकी 8 सामने गमावले आहेत, तर केवळ 3 सामन्यात विजय मिळवला आहे. यामुळे आता धोनीच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

  • Share this:

शारजा, 24 ऑक्टोबर : गेल्या 12 वर्षात दरवर्षी प्ले ऑफ गाठणारा संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings). मात्र यावेळी एक वेगळाच प्रकार दिसला. CSKचा संघ सध्या गुणतालिकेत तळाशी आहे. त्यामुळे धोनीच्या (Ms Dhoni) नेतृत्वाखाली यंदा CSKचं प्ले ऑफ गाठण्याचं स्वप्न भंगलं आहे. CSKनं या हंगामात 11 सामन्यांपैकी 8 सामने गमावले आहेत, तर केवळ 3 सामन्यात विजय मिळवला आहे. यामुळे आता धोनीच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईला 10 विकेटनं पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर धोनीच्या आयपीएल निवृत्तीच्या चर्चा समोर आल्या आहेत. एक फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर चाहत्यांच्या मनात ही आयपीएल धोनीची शेवटची स्पर्धा असून शकते. याआधी धोनीनं 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर धोनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही.

मुंबई इन, चेन्नई आऊट! 12 वर्षात पहिल्यांदाच घडला असा प्रकार, पाहा Point Table

दरम्यान, मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर धोनीनं आपल्या नावाची जर्सी हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांना भेट दिली. ही पहिली वेळ नाही आहे. याआधी धोनीनं आपल्या नावाची जर्सी अनेक खेळाडूंना दिली आहे.

वाचा-IPL 2020 : मुंबईच्या खेळाडूला नव्हती खेळायची आयपीएल, आता ठरतोय मॅच विनर

At the end of the day, Cricket Hamari Jaan. #Yellove #CSKvMI pic.twitter.com/xBNDLGaWCg

राजस्थान रॉयल्सचा खेळाडू जॉस बटलर यालाही धोनीनं जर्सी दिली होती. त्यामुळे धोनी आपल्या विरोधी संघातील खेळाडूंना जर्सी देऊन निवृत्तीचे संकेत तर देत नाही आहे ना? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

वाचा-IPL 2020 : 'त्या खेळाडूंवरचे 15 कोटी रुपये पाण्यात', क्रिकेटपटूचा धोनीवर निशाणा

दरम्यान, आयपीएलच्या या मोसमात एमएस धोनी (MS Dhoni)च्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. युवा खेळाडूंना संधी न देता वारंवार फॉर्ममध्ये नसणाऱ्या खेळाडूंना खेळवलं जात आहे. या टीममधल्या बहुतेक खेळाडूंचं वय 35 च्या पुढे आहे, त्यामुळे फक्त धोनी नाही तर अनेक खेळाडूंसाठी यंदाची आयपीएल शेवटची ठरू शकते.

Published by: Priyanka Gawde
First published: October 24, 2020, 1:14 PM IST

ताज्या बातम्या