स्पोर्ट्स

  • associate partner

'मुरली विजय हे काय केलंस?' त्या एका चुकीमुळे दुसऱ्याच ओव्हरमध्ये चेन्नईनं टेकले हात

'मुरली विजय हे काय केलंस?' त्या एका चुकीमुळे दुसऱ्याच ओव्हरमध्ये चेन्नईनं टेकले हात

विजय बाद झाल्यानंतर चेन्नईच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात सुरुवात केली.

  • Share this:

अबू धाबी, 19 सप्टेंबर : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super kings)यांच्यात आयपीएलमधला पहिला सामना होत आहे. चेन्नईने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला 163 धावांचे आव्हान केले. मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका बसला. ट्रेंट बोल्टने शेन वॉट्सनला 4 धावांवर बाद केले, यासह पहिल्याच ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सला यश मिळाले.

दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूपासूनच मुरली विजय दबावात दिसत होता. जेम्स पॅटिंनसच्या चेंडूवर मुरली विजयला फलंदाजी करणं कठिण जात होतं. दोन वेळा LBW साठी अपील केल्यानंतर अखेर शेवटच्या चेंडूवर पंचांनी मुरली विजयला बाद घोषित केले. फाफ ड्यू प्लेसिस मुरली विजयला रिव्ह्यू घेण्यासाठी सांगत होता, मात्र विजय मैदानाबाहेर गेला. रिव्ह्यूमध्ये विजय नाबाद असल्याचे दिसत होते.

विजय बाद झाल्यानंतर चेन्नईच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात सुरुवात केली. गोलंदाज प्रग्यान ओझानेही ट्वीट करत विजय पहिल्या चेंडूपासूनच दबावात असल्याचे दिसत होता, असे ट्वीट केले.

विजयने सात चेंडूत केवळ एक धाव केली. त्यामुळे मुंबईनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची अवस्था खराब झाली. पहिल्या दोन ओव्हरमध्ये सलामीचे फलंदाज बाद झाल्यानंतर आता मधल्या फळीवर चेन्नईची मदार आहे.

पहिल्या डावात मुंबईकडून सौरभ तिवारी (42) वगळता एकाही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. चेन्नईकडून लूंगी नग्धीनं तीन विकेट घेतल्या. तर राहुल चाहर आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

Published by: Priyanka Gawde
First published: September 19, 2020, 10:38 PM IST

ताज्या बातम्या