स्पोर्ट्स

  • associate partner

IPL2020: 99वर बोल्ड झाल्याने संतापून गेलने फेकली बॅट, पण जोफ्राबरोबर असं वागला की जिंकलं सर्वांचं मन

IPL2020: 99वर बोल्ड झाल्याने संतापून गेलने फेकली बॅट, पण जोफ्राबरोबर असं वागला की जिंकलं सर्वांचं मन

शुक्रवारच्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत ख्रिस गेलने टी-20मध्ये 1000 षटकार मारण्याचा रेकॉर्ड केला पण त्याचं शतक मात्र हुकलं. 99 वर बाद झालेल्या गेलने मैदानाच संताप व्यक्त केला पण काही क्षणातच त्याने दाखवून दिलं की क्रिकेट 'Gentleman's Game' आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर : आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत (IPL 2020) शुक्रवारी झालेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध (Kings XI Punjab) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या सामन्यात राजस्थानने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी निवडली. किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीवीर मनदीपसिंग शून्य धावा करून परतला. त्यानंतर ख्रिस गेल (Chris Gayle) आणि कर्णधार के. एल. राहुल (KL Rahul) यांनी सामन्याची धुरा सांभाळली.

धडाकेबाज फलंदाजी करत गेलने एक नवा विक्रमदेखील केला. गेल टी-20 मध्ये 1000 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू ठरला. वयाच्या 41व्या वर्षी त्याने हा रेकॉर्ड केला आहे. त्याने तुफान फलंदाजी करत स्वत:बरोबरच संघाचा स्कोरही वर नेला. ख्रिस गेल 93 धावांवर खेळत असताना त्यानी जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर एक दमदार षटकार मारला आणि 99 धावा पूर्ण केल्या. गेलचे चाहते आणि इतर सर्वांनाच त्यांच्या शतकाची आतुरता लागली होती.परंतु घडलं भलतंच, अगदी दुसऱ्याच चेंडूवर जोफ्राने टाकलेला एक इन-स्विंग चेंडू गेलच्या पॅडला लागून स्टंप्सवर आदळला आणि गेल 99 धावांवर क्लीन बोल्ड झाला. केवळ एका धावेने त्याचं शतक हुकलं.

शतक हुकल्यामुळे गेल क्षणार्धात संतापला आणि त्याला त्याचा राग  आवरता आला नाही. त्यांने रागातच आपली बॅट फेकून दिली. अर्थात तो इतर कुणावर नाही तर स्वत: वरच चिडला होता. एक चेंडू चुकीचा खेळल्याने एक शतक हुकल्याचं दु:ख त्याला होतं. पण काहीच क्षणात त्याने रागावर नियंत्रण मिळवलं आणि  पॅव्हेलियनमध्ये परतताना त्याची विकेट घेणाऱ्या जोफ्रा आर्चरशी हातही मिळवला.

त्याच्या या तुफान खेळीनंतर सामन्याच्या मध्यंतरात गेल म्हणाला, 'ही खेळी चांगली झाली. मला वाटतं 180 ही चांगली धावसंख्या आहे. विकेट चांगली आहे आणि रात्री ती आणखी चांगली होईल. 99 धावांवर बाद होणं दुर्दैवी आहे'. त्याला बाद करणाऱ्या जोफ्रा आर्चरच्या चेंडूबद्दल तो म्हणाला, 'त्याने चांगला चेंडू टाकला होता. खेळात असं घडतंच.'

(हे वाचा-वयाच्या 41व्या वर्षी हजारावा षटकार, टी-20मध्ये असा रेकॉर्ड करणार एकमेव खेळाडू)

आयपीएलची ट्रॉफी जिंकायला आवडेल अशी प्रतिक्रियाही गेलने यावेळी दिली. वयाच्या 41व्या वर्षी अशी धडाकेबाज खेळी करणाऱ्या गेलचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्याने केलेल्या 1000 षटकारांच्या विक्रमाबद्दल गेल म्हणाला, ‘अशा विक्रमाच्या मी जवळ आहे हे माझ्या लक्षातच नव्हतं. मी आपला नेहमीप्रमाणे तरुण खेळाडूंसोबत खेळत होतो. इतकी वर्षं केलेले कष्ट आणि प्रयत्नांचं सार्थक झालं.’

(हे वाचा-IPL 2020 : Lockdown मध्ये घराच्या गच्चीवर पत्नीने करून घेतला होता असा सराव VIDEO)

गेलच्या दमदार बॅटिंगमुळे पंजाबने 185 धावांचं लक्ष्य राजस्थानसाठी उभारलं होतं. परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये पंजाबच्या गोलंदाजांची कामगिरी खास न झाल्यामुळे राजस्थान रॉयल्सने सहजच हे लक्ष्य गाठलं. बेन स्टोक्सच्या वेगवान अर्धशतकाने यात मदत केली. संजू सॅमसनने सुद्धा केलेल्या 48 धावांमुळे राजस्थानच्या संघाने हा सामना 15 चेंडू राखून जिंकला.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 31, 2020, 2:37 PM IST
Tags: IPL 2020

ताज्या बातम्या