मुंबई. 12 जून 2016 ही ती तारीख आहे ज्यादिवशी अनिल कुंबळे (Anil Kumble) याला भारतीय टीमचा हेड कोच बनविण्यात आलं होतं. बीसीसीयच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक केलं जात होतं. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि कुंबळे यांची जोडी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुफान गाजेल अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. झालंही तसंच.
कुंबळे कोच असताना टीम इंडिया यशाचं शिखर चढत होता. मात्र 20 जून 2017 रोजी कुंबळे कोच पदावरुन बाहेर पडला. त्याने एक वर्षानंतर आपला कार्यकाळ वाढवलाच नाही. यानंतर क्रिकेट विश्वात मोठा गोंधळ झाला. शेवटी कुंबळेने कोच पदावरुन बाहेर जाण्याचा निर्णय का घेतला? यावर सवाल उपस्थित करण्यात आला. त्यानंतर विराटमुळे कुंबळे टीम इंडियाच्या कोचपदावरुन बाहेर केल्याची माहिती समोर आली.
हे ही वाचा-"IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळविराटला शिकवला धडा
क्रिकेटर कुंबळे विराटसोबतच्या नात्याविषयी कधीच मोकळेपणाने व्यक्त झाला नाही. मात्र 3 वर्षांनंतर विराटला कुंबळेने पंजाब किंग्ज इलेव्हनचा कोच असताना धडा शिकवला. त्याला या सामन्यात असं अपयश पाहायला मिळालं की येत्या वर्षात तो ते कायम लक्षात ठेवेल.
कुंबळेचं विरारला सडेतोड उत्तर
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अनिल कुंबळेला पंजाब किंग्ज इलेव्हनने कोच बनवलं होतं. ज्यानंतर त्याने खूप मेहनत घेतली. कुंबळे यावेळी ठोस रणनीतीसह काम करीत होते. याचं उदाहरण म्हणजे, क्रिस गेलसारख्या आक्रमक फलंदाजाला तो सध्या प्लेइंग इलेवनमध्ये जागा देत नाही. कुंबळे हा मयंक अग्रवालकडून ओपनिंग करवित आहेत. कर्नाटकचे केएल राहुल टीमचा कर्णधार आहे. आणि या दोघांची जोडी खूप पसंत केली जात आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 619 विकेट घेणारे कुंबळे या दिवसात पंजाब नेट सेशनमध्येही गोलंदाजी करीत आहेत. यंदाच्या आयपीएलमघ्ये ते एकमात्र भारतीय कोच आहेत. पंजाबची टीम अद्याप एकदाही चॅम्पियन होऊ शकली नाही. अशात कुंबळे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.