Home /News /sport /

IPL 2020 Point Table: 6 सामने गमावूनही पंजाब गाठणार प्ले ऑफ? पॉइंट टेबलमध्ये झाला मोठा बदल

IPL 2020 Point Table: 6 सामने गमावूनही पंजाब गाठणार प्ले ऑफ? पॉइंट टेबलमध्ये झाला मोठा बदल

सुपरओव्हरनं पालटलं पंजाबचं नशीब, प्ले ऑफच्या शर्यतीसाठी पाहा कोणता संघ कितव्या स्थानी.

    नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2020) ही स्पर्धा जस जशी प्ले ऑफच्या दिशेनं जात आहे, तसा तसा रोमांच वाढत आहे. रविवारचा (18 ऑक्टोबर) दिवस केवळ आयपीएलच नाही तर क्रिकेटसाठी खास होता. कारण एकाच दिवसात तीन सुपरओव्हर पाहायला मिळाल्या. डबल हेडरमध्ये कोलकाता नाइट राइडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध झालेल्या सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला. मुख्य म्हणजे दोन्ही सामने सुपरओव्हरमध्ये गेले. पहिले KKRनं सुपरओव्हरमध्ये हैदराबादला नमवलं. तर, पंजाबनं आयपीएल इतिहासात दोन सुपरओव्हरमध्ये मुंबईला हरवलं. या दोन्ही सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. पंजाबचा संघ 6 गुणांसह आता सहाव्या स्थानी पोहचला आहे. लीगच्या सुरुवातीपासून हा संघ तळाशी होता. मात्र बॅंगलोर आणि मुंबईला हरवल्यानंतर पंजाबच्या प्ले ऑफ गाठण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. वाचा-IPL 2020 : रसेलला शेवटची ओव्हर का दिली? मॉर्गनने सांगितलं कारण वाचा-IPL 2020 : बॉलिंग टाकायला परवानगी, तरी नारायणला का खेळवलं नाही? मॉर्गन म्हणतो... तर, मुंबईनं सामना गमावल्यानंतरही 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर, दिल्लीचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरचा संघही 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे हे तीन संघ प्ले ऑफ गाठू शकतात. मात्र चौथा संघ कोण असेल हे पाहणे महत्त्वाचे असेल. वाचा-IPL 2020 : ...म्हणून रोहित शर्मा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगला आला नाही रविवारी झालेल्या सामन्यात हैदराबादविरुद्धच्या या विजयासोबतच कोलकात्याचे 10 पॉईंट्स झाले आहेत. केकेआरने या मोसमात 9 पैकी 5 मॅचमध्ये विजय मिळवला आहे, तर 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये केकेआर चौथ्या क्रमांकावर आहे. तर हैदराबाद 6 पॉईंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. हैदराबादने 9 पैकी 3 मॅच जिंकल्या असून 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या