मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

KKR vs KXIP : कौतुक करावं तेवढं कमी! अर्धशतकी खेळीनंतर मनदीपच्या डोळ्यात आलं पाणी, पूर्ण केली वडिलांची 'ती' इच्छा

KKR vs KXIP : कौतुक करावं तेवढं कमी! अर्धशतकी खेळीनंतर मनदीपच्या डोळ्यात आलं पाणी, पूर्ण केली वडिलांची 'ती' इच्छा

वडिलांच्या निधनानंतर संघासाठी खेळला, आता आपल्या बॅटनं पूर्ण केली त्यांची 'ती' इच्छा.

वडिलांच्या निधनानंतर संघासाठी खेळला, आता आपल्या बॅटनं पूर्ण केली त्यांची 'ती' इच्छा.

वडिलांच्या निधनानंतर संघासाठी खेळला, आता आपल्या बॅटनं पूर्ण केली त्यांची 'ती' इच्छा.

  • Published by:  Priyanka Gawde
शारजा, 27 ऑक्टोबर : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL 2020) किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी (KXIP) सर्व सामने आता करो वा मरो आहेत. यातच आता सलग पाच सामने जिंकत पंजाबचा संघ गुणतालिकेतही चौथ्या क्रमांकावर आला आहे. कोलकाताविरुद्ध झालेल्या सामन्यात 8 विकेटनं विजय मिळवला. या सामन्यात मनदीप सिंगनं (Mandeep Singh) 66 धावांनी महत्त्वपूर्ण खेळी केली आहे. मनदीप सिंगच्या या खेळीच्या जोरावर पंजाबनं हा सामना एकहाती जिंकला. मनदीपनं गेलसोबत मिळून 100 धावांनी भागीदारी केली. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर मात्र मनदीप भावूक झाला. कारण वडिलांच्या निधनानंतर मनदीप संघासाठी खेळत होता. या सामन्यात मनदीपनं 56 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 66 धावांची खेळी केली. मनदीपनं अर्धशतकी खेळी केल्यानंतर आपल्या वडिलांना ही खेळी समर्पित केली. एवढेच नाही तर सामना संपल्यानंतर मनदीपनं वडिलांची इच्छा पूर्ण केल्याचे सांगितले. वाचा-पंजाबच्या विजयानं आता विराट आणि रोहितचीही चिंता वाढली! बदलली प्ले ऑफची समीकरणं वाचा-IPL 2020 : मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक पूर्ण केल्यानंतर बेन स्टोक्स झाला भावुक मनदीपनं सामन्यानंतर, "ही खेळी माझ्यासाठी खास होती. माझे वडिल मला नेहमी सांगायचे की, प्रत्येक सामन्यात नॉट आऊट राहत जा. त्यामुळे ही खेळी खास होती. ते मला नेहमी सांगायचे तू 100 धावा कर किंवा 200 पण आऊट होऊ नकोस. सामन्याआधी माझं राहुलशी बोलणं झालं होते. मागच्या सामन्यात मी जलद धावा करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा राहुल मला म्हणाला की स्वाभाविक खेळ कर". मंदीपनं यावेळी कर्णधार राहुलचंही कौतुक केलं. मनदीप म्हणाला की, "त्यानं माझ्या खेळाचे समर्थन केले आणि मला जसं खेळायचं आहे तसं खेळू दिलं. संघाच्या विजयामळे मी खूप खूश आहे". मनदीपनं अर्धशतकी खेळी केल्यानंतर केएल राहुल आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी मैदानात येऊन मनदीपचे कौतुक केले होते. एवढेच नाहीतर सामन्यानंतर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनीही मनदीपचं कौतुक केलं. वाचा-IPL 2020 : मुंबईला मोठा धक्का, हिटमॅन रोहित शर्मा आयपीएलला मुकणार? याआधी हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात मनदीप वडिलांच्या मृत्यूनंतर लगेचच मैदानात उतरला होता. या सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाही. मात्र सचिन तेंडुलकरपासून सर्व दिग्गज खेळाडूंनी मनदीपचं कौतुक केलं होतं.
First published:

Tags: Kl rahul

पुढील बातम्या