pl दुबई, 21 ऑक्टोबर : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL 2020) किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) सध्या जबरदस्त कामगिरी करत आहे. हंगामाच्या सुरुवातीला गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या संघानं सलग तीन सामना जिंकले आहेत. गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सला हरवल्यानंतर मंगळवारी पंजाबनं अव्वल स्थानी असलेल्या दिल्लीला 5 विकेटनं पराभूत केले. यासह पंजाबचा संघ थेट पाचव्या क्रमांकावर आला आहे.
मंगळवारी झालेल्या सामन्यात दिल्लीनं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीला चांगली सुरुवात करता आली नाही. मात्र शिखर धवनच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर दिल्लीनं 164 धावा केल्या. पंजाबसाठी हा विजय महत्त्वाचा होता. दिल्लीनं दिलेलं आव्हान पार करताना पंजाबचीही सुरुवात चांगली झाली नाही. फॉर्ममध्ये असलेले केएल राहुल आणि मयंक अग्रवाल लवकर माघारी परतले. राहुल 15 वर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या गेलनं आक्रमक फलंदाजी केली.
वाचा-पंजाबच्या विजयी हॅट्रिकनं वाढवली 4 संघांची चिंता, टाका Point Tableवर एक नजर
मात्र दिल्लीसाठी कर्दनकाळ ठरली ती पाचवी ओव्हर. कर्णधार श्रेयस अय्यरनं युवा गोलंदाज तुषार देशपांडेच्या हाती चेंडू दिला. मात्र गेलनं गय न करत तुषारला अस्मान दाखवले. तुषार देशपांडेच्या एका ओव्हरमध्ये गेलनं 26 धावा केल्या. पहिल्या दोन चेंडूवर चौकार मारल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार तर चौथ्या चेंडूवर पुन्हा चौकार अशा तब्बल 25 धावा केल्या. या ओव्हरमध्येच खरतर दिल्लीला पराभव दिसला होता.
वाचा-IPL 2020 : 'थाला' म्हणणाऱ्या चाहतीला केएल राहुल म्हणाला...
गेलनं तुषार देशपांडेला झोडलं मात्र पुढच्याच ओव्हरमध्ये अश्विननं त्याला माघारी धाडलं. गेलं 13 चेंडूत 28 धावा करत बाद झाला. पंजाबसाठी मॅच विनर ठरला तो निकोलस पूरन. निकोलस पूरनने 28 बॉलमध्ये 53 रन केले. यंदाच्या मोसमात फॉर्मसाठी संघर्ष करणाऱ्या मॅक्सवेलनेही 24 बॉलमध्ये 32 रन करुन मोलाची मदत केली. दीपक हुडा 15 रनवर नाबाद आणि जेम्स नीशम 8 रनवर नाबाद राहिले.
वाचा-IPL 2020 : पूरनचं धडाकेबाज अर्धशतक, पंजाबचा दिल्लीवर विजय
ICYMI - Gayle's 24-run blitz in one over.
Tushar Deshpande was at the receiving end as @henrygayle smashed three boundaries and two sixes in one over. Vintage Gayle on display.https://t.co/VmXFT2CiUv#Dream11IPL
पंजाबच्या या विजयानंतर KKR, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि CSK या संघाच्या चिंता वाढल्या आहेत. कारण पंजाबचा रन रेटही चांगला आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.