IPL 2020: पंजाबने 'शॉर्ट रन' कॉल विरोधात केलं अपील, वाचा नियम 2.12 आहे तरी काय?

IPL 2020: पंजाबने 'शॉर्ट रन' कॉल विरोधात केलं अपील, वाचा नियम 2.12 आहे तरी काय?

पंजाब संघाने मैदानावरील पंच नितिन मेनन यांच्या वादग्रस्त ‘शॉर्ट रन’ कॉल विरोधात अपील केले आहे. तर माजी क्रिकेटपटूंनी योग्य निकालासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याची मागणी केली.

  • Share this:

दुबई, 21 सप्टेंबर : किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) विरुग्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) सामन्यात एक वेगळाच थरार पाहायला मिळाला. मात्र पंचांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे आता प्रकरणं तापलं आहे. पंजाब संघाने मैदानावरील पंच नितिन मेनन यांच्या वादग्रस्त ‘शॉर्ट रन’ कॉल विरोधात अपील केले आहे. तर माजी क्रिकेटपटूंनी योग्य निकालासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याची मागणी केली.

सामना सुपर ओव्हरवरमध्ये जाण्यापूर्वी टीव्ही फुटेजमध्ये स्क्वेअर लेग पंच मेननने ख्रिस जॉर्डनला 19व्या ओव्हरमधील तिसर्‍या चेंडूवर 'शॉर्ट रन'साठी रोखले. मात्र टीव्ही रीप्लेवरून हे स्पष्ट झाले की जेव्हा त्याने पहिला रन पूर्ण केला तेव्हा जॉर्डनची बॅट क्रीजच्या आत होती. मात्र मेनन यांनी जॉर्डनने क्रीजपर्यंत पोहचला नाही म्हणून एकच धाव दिली. तांत्रिक पुरावे असूनही पंचांनी या निर्णय बदल केला नाही. अखेरच्या षटकात पंजाबला 13 धावांची आवश्यकता होती आणि अग्रवालने पहिल्या तीन चेंडूंमध्ये 12 धावा केल्या. पंजाबचा संघ एक धाव मागे होता आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला, त्यात दिल्लीने विजय मिळवला.

वाचा-पंजाब जिंकणार होता सामना? Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली

किंग्ज इलेव्हन पंजाबचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश मेनन म्हणाले की, आम्ही मॅच रेफरीकडे अपील केले आहे. माणसाकडून चूक होऊ शकते, मात्र आयपीएलसारख्या जागतिक स्तरावरील स्पर्धेत त्याला चुकीला जागा नाही. की एक धाव आम्हाला प्लेऑफपासून वंचित ठेवू शकते. मेनन म्हणाले की, "पराभव हा पराभवच असतो. जे घडलं ते अन्यायकारक आहे. अपेक्षा आहे की नियमांमध्ये बदल केला जाईल. जेणेकरून अशा प्रकारच्या चुका पुन्हा होणार नाहीत".

वाचा-6 Wd 4 4 4 6 3! जॉर्डनच्या एका ओव्हरनं पंजाबच्या 10 खेळाडूंची मेहनत गेली वाया

दरम्यान, आयपीएल नियम 2.12 (अंपायरचा निर्णय) पंचांनी घेतलेला निर्णयात तेव्हाच बदल केले तरच पंच निर्णय बदलू शकतात. याशिवाय पंचांचा निर्णय अंतिम मानला जातो.

वाचा-LIVE: सुपर ओव्हरमध्ये दिल्लीनं जिंकला सामना, मयंक अग्रवालची खेळी व्यर्थ

दरम्यान, याबाबत माजी भारतीय ओपनर विरेंद्र सेहवाग यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरुन ट्विट करीत लिहिले आहे की, मी मॅन ऑफ द मॅच निवडीबाबत समर्थन देत नाही. ज्या अम्पायरने याला शॉर्ट रन दिले आहे, त्याला खरं मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायला हवं. शॉर्ट रन नसतानाही त्याने तो निर्णय घेतला. तर संघ मालकिन प्रीती झिंटानेही या निर्णयावरून पंचांना सुनावले.

Published by: Priyanka Gawde
First published: September 21, 2020, 3:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading