स्पोर्ट्स

  • associate partner

विराटच्या फेव्हरेट फलंदाजानं दिला श्रेयस अय्यरला धोका, फक्त एक चौकार मारून बाद

विराटच्या फेव्हरेट फलंदाजानं दिला श्रेयस अय्यरला धोका, फक्त एक चौकार मारून बाद

फलंदाजीला आलेल्या हेटमायरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. हेटमायर केवळ एक चौकार मारत बाद झाला.

  • Share this:

दुबई, 20 सप्टेंबर : दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्या तेराव्या हंगामाचा दुसरा सामना होत आहे. या सामन्यात पंजाबनं टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. मोहम्मद शमीच्या स्विंगपुढे दिल्लीचे फलंदाजी टिकू शकले नाही. शिखर धवन शून्यावर धावबाद झाल्यानंतर पृथ्वी शॉही 5 धावा करत बाद झाला.

मात्र त्यानंतर फलंदाजीला आलेल्या हेटमायरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. हेटमायर केवळ एक चौकार मारत बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरनं या वेस्ट इंडिज फलंदाजाला आक्रमक खेळी करण्यासाठी संघात जागा दिली होती. मात्र तसे झाले नाही. एक चौकार मारत पुढच्याच चेंडूवर शमीच्या चेंडूवर हेमायर बाद झाला. हेटमायरने 13 चेंडूत 7 धावा केल्या.

वाचा-DC vs KXIP LIVE: पंजाबची जबरदस्त गोलंदाजी, 3 विकेटनंतर श्रेयस-पंत क्रिझवर

वाचा-पंजाबनं 2 कोटींना विकत घेतलेल्या 'युवा कुंबळे'ला दिली संघात जागा

श्रेयस अय्यरनं या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये अॅलेक्स कैरीच्या ऐवजी हेटमायरला संधी दिली. ऑस्ट्रेलियन फलंदाज अॅलेक्सनं नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्ध मालिकेत शतकी कामगिरी केली होती. मात्र हेटमायरनं दिलेल्या संधीचं सोनं केलं नाही. आजच्या सामन्यात अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेलाही संधी दिली नाही.

Published by: Priyanka Gawde
First published: September 20, 2020, 8:37 PM IST
Tags: IPL 2020

ताज्या बातम्या